रावेर,(प्रतिनिधी)- रावेर-यावल विधानसभा मतदारसंघ निवडणूक 2024 च्या अनुषंगाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार,शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार धनंजय शिरीषदादा चौधरी यांनी दिनांक १७ रोजी यावल तालुक्यातील डो. कठोरा,सातोद, कोळवद, यावल शहर ग्रामस्थांशी संवाद साधला, यावेळी प्रचार रॅलीचे ग्रामस्थांनी भव्य स्वागत केले.
आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या माध्यमातून कोळवड सांगवी रोडवर पूल बांधकाम करणे व्यायाम शाळा तसेच गावाअंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण पेव्हर ब्लॉक, इ मुलभुत सुविधांची कामे झालेली आहेत मतदारसंघात पुन्हा नव्याने विकास पर्वाला सुरुवात करण्यासाठी या निवडणुकीत माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून मतदानरुपी आशिर्वाद देण्याची ग्रामस्थांना विनंती केली यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावल तालुक्यातील डो. कठोरा,सातोद, कोळवद, यावल शहर या गावांना भेटी देत त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले की, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने व महाविकास आघाडीच्या जेष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवत आहे. मतदारसंघातील शेतकरी, कष्टकरी, महिला आणि युवकांचे प्रश्न विधिमंडळात मांडून त्यांची सोडवणूक करण्यासाठी, तसेच रावेर यावल विधानसभा मतदारसंघाचा शाश्वत विकास साधण्यासाठी हाताचा पंजा या चिन्हासमोरील बटण दाबून मतदानरूपी आशीर्वाद द्यावा.
गेले अनेक वर्षे मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना लोकसेवक मधुकरराव चौधरी व आमदार शिरीषदादा चौधरी यांनी केलेला सर्वांगीण विकास आणि त्यांचा विकासाचा वसा, वारसा अखंडितपणे पुढे चालवण्याची आम्ही ग्रामस्थांना ग्वाही दिली.
महायुतीच्या सरकारमुळे अडीच वर्षात अनेक कामे थांबवली गेली. त्यामुळे निश्चितचं काही कामे राहून गेली आहेत. ती कामे पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे ते नक्की पूर्ण करू असे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले. यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.