पाळधी, तालुका धरणगाव – ना गुलाबराव पाटील यांच्या समर्थनार्थ पाळधी येथे आज रोजी पाळधी गावातील विविध मंडळाच्या सदस्यांची तसेच सर्व राजकीय व सामाजिक पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
प्रसंगी माझे मत गावासाठी गावाचा भूमिपुत्रासाठी असा प्रसंग अनुभवण्यात मिळाला शेकडोच्या संख्येने पाळधीकरांची उपस्थिती लाभल्याने मंत्री गुलाबराव पाटील भारावले.ही लढाई माझी नसून गावाची लढाई आहे मी गावाला अजून एकच विनंती करणार आहे की तुम्ही सर्व माझ्या पाठीशी ज्याप्रमाणे आज पर्यंत उभे राहिलात तसेच यापुढे देखील उभे राहवे मी कधी कोणाचं काम करताना कोणाची जात पहिली नाही. कोणाचा धर्म पहिला नाही कोण कोणता पक्षाचा हे देखील मी आतापर्यंत कधी बघितलं नाही.
मी काम करताना फक्त एक विचार केला की हा व्यक्ती आपल्या गावाचा आहे त्याच काम करणं आपलं कर्तव्य आहे. या भावनेतून मी आपल्या गावाचा विकास करण्याचा सुद्धा देखील प्रयत्न केला आहे.
भाजपाचे ज्येष्ठ नेते सुनील झवर यांनी बोलताना त्यांचा वैयक्तिक जीवनाचा अनुभव मांडत सांगितले की गुलाबराव पाटील हे माझे लहानपणापासून मित्र असून त्यांचं समाजात वागणं आणि त्यांचं राजकारण जवळून बघितल आहे ते अतिशय मनमिळाऊ आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारा व्यक्तिमत्त्व आहेत. त्यामुळे जी व्यक्ती सगळ्यांना घेऊन चालते त्या व्यक्ती मागे म्हणजेच आपल्या भूमिपुत्रामागे आपण सर्वांनी मोठ्या ताकतीने आणि शक्तीने उतरवून त्यांचं मताधिक्य वाढवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे.
प्रसंगी मुस्लिम समाज पंच कमिटीचे हाजी यासीन पठाण मास्तर यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की मंत्री गुलाबराव पाटील यांनी कधी जात कधी धर्म बघितला नाही अशा सर्व समावेशक सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चालणाऱ्या मंत्री गुलाबराव पाटील यांचा पाठीमागे संपूर्ण पाळधी नगरी एकोप्याने उभी राहिली असे प्रतिपादन त्यांनी प्रसंगी बोलताना केले.
मुकुंदराव नन्नवरे यांनी बोलताना सांगितले की मंत्री गुलाबराव पाटलांनी माझ्यासारख्या दलित कुटुंबातील साधारण कार्यकर्त्याला जनरल मधून सभापती केलं त्यांनी कार्यकर्ता मोठा करताना कोणकोणत्या जातीचा आणि कोण कोणता धर्माचा आहे हे कधीच बघितले नाही अशा नेत्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने राहून आपले गाव एकत्र आहे हे संपूर्ण मतदार संघालाच नव्हे जिल्ह्याला दाखवून द्यायचा आहे की मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठीशी त्यांचा गाव कायम एकजुटीने राहतात.
माळी समाज देखील मोठ्या संख्येने मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठीशी उभा राहील असे वक्तव्य आबा माळी यांनी केले प्रसंगी माजी सभापती तसेच दोघ गावांचे सरपंच तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य त्या समवेत गावातील सर्व प्रतिष्ठित जेष्ठ नागरिक व सर्व राजकीय सामाजिक क्षेत्राचे पदाधिकारी त्यांचा सोबत पाळधी गावातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.