जळगाव (प्रतिनिधी) : शहर विधानसभा निवडणूक प्रचारार्थ अपक्ष उमेदवार डॉ. अश्विन सोनवणे यांनी शनिवारी शहरातील विविध भागात जात मतदारांशी संवाद साधत प्रचार केला यावेळी रांगोळ्या,फुले,पाकळ्यांच्या वर्षावात जल्लोषात स्वागत करण्यात आलं.
निवडणुकीत दिलेल्या जाहीरनामा नुसार प्रत्यक्षात काम करण्यात येईल व जळगावचा शाश्वत विकास करण्यासाठी मी वचनबद्ध असल्याचा विश्वास अपक्ष उमेदवार डॉ. अश्विन सोनवणे यांनी दिला.गल्लीबोळात घरोघरी जाऊन जेष्ठाचें आशीर्वाद घेत जळगावच्या विकासाठी मतदानरूपी आशीर्वाद द्या अशी विनंती केली.