रावेर,(प्रतिनिधी) – रावेर- यावल विधानसभा मतदारसंघ निवडणूक 2024 च्या अनुषंगाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार,शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धनंजय शिरीषदादा चौधरी यांनी रावेर तालुक्यातील पुनखेडा, पातोंडी, निभोरा सिम, थेरोळा, धूरखेडा,बोहर्डी, नांदूरखेडा,अजंदे येथील ग्रामस्थांशी संवाद साधला.
आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या माध्यमातून पुनखेडा गावाजवळ पूल बांधकाम करणे अंदाजित रक्कम 4 कोटी तसेच पुनखेडा, पातोंडी, निभोरा सिम, थेरोळा, धूरखेडा,बोहर्डी, नांदूरखेडा,अजंदे गावाअंतर्गत रस्ते ,काँक्रीटीकरण डांबरी करण पेव्हर ब्लॉक, इ मुलभुत सुविधांची कामे झालेली आहेत मतदारसंघात पुन्हा नव्याने विकास पर्वाला सुरुवात करण्यासाठी या निवडणुकीत मतदानरुपी आशिर्वाद देण्याची उमेदवार धनंजय चौधरी यांनी ग्रामस्थांना विनंती केली यावेळी सोबत महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.