जळगाव,(प्रतिनिधी)- राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरु आहे. विधानसभेचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असतानाच जळगाव शहरातील अपक्ष उमेदवार अश्विन सोनवणे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.शहरातील सुप्रीम कॅालनी .रामेश्वर कॅालनी,मास्टर कॅालनी,द्दत्त नगर,अशोक किराणा,काशिनाथ लॅाजचा परिसर या भागातील नागरिकांशी संवाद साधत जळगावच्या विकासासाठी मला एकदा संधी द्या अशी विनंती अपक्ष उमेदवार डॉ.अश्विन सोनवणे यांनी केली.
विधानसभा निवडणूक प्रचारार्थ जळगाव शहरातील विविध भागातील नागरिकांशी चर्चा करतांना प्रचार संवाद दौऱ्यात नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद आणि मिळालेल्या प्रेमाने, विश्वासाने मला जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळत असल्याचं डॅा.अश्विन शांताराम सोनवणे यांनी म्हटलं आहे.