पाचोरा,(प्रतिनिधी)- पाचोरा – भडगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, आरपीआय (आठवले गट)पिआरपी व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या प्रचारार्थ सुप्रसिद्ध सिनेअभिनेता गोविंदा आहुजा यांचीभव्य बाईक रॅलीचे शनिवार दि. 16 नोव्हेंबर 2024 रोजी पाचोरा दु. 3 वा. व भडगाव दु. 4 वा. करण्यात आले आहे.तरी कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
पाचोरा मार्ग: छत्रपती शिवाजी महाराज चौक आठवडे बाजार गांधी चौक जामनेर रोड स्टेशन रोड, देशमुख वाडी पंचमुखी हनुमान चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक समाप्ती
भडगाव मार्ग: डी.एड. कॉलेज मेनरोड आझाद चौक समाप्ती बाळद रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे तहसील कार्यालय