रावेर विधानसभा क्षेत्रातील यावल तालुक्यातील बोरावल,भालशिव,पिंप्री,टाकरखेडा,बोरावल बु, येथे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार धनंजय शिरीषदादा चौधरी यांच्या प्रचारार्थ दिनांक १३ रोजी प्रचार रॅली, होम टू होम प्रचार करण्यात आला.यावेळी युवा व शिक्षित उमेदवार धनंजय चौधरी यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला असून मतदार संघाच्या शाश्वत विकासाकरिता मला संधी द्या अशी विनंती धनंजय चौधरी यांनी केली.
रावेर_यावल विधानसभा मतदारसंघ निवडणूक 2024 च्या अनुषंगाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार,शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार धनंजय चौधरी यांनी प्रचारात आघाडी घेतली असून यावल तालुक्यातील बोरावल ,भालशिव,पिंप्री, टाकरखेडा, बोरावल बु, ग्रामस्थांशी संवाद साधला.आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या माध्यमातून विविध गावाअंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण पेव्हर ब्लॉक,इ मुलभुत सुविधांची कामे झालेली आहेत मतदारसंघात पुन्हा नव्याने विकास पर्वाला सुरुवात करण्यासाठी या निवडणुकीत माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून मतदानरुपी आशिर्वाद देण्याची ग्रामस्थांना विनंती केली यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते….