जळगाव : जळगाव जिल्ह्यातील जामनेर विधानसभा क्षेत्रातील एका सेना दलामधील जवानाने डाक मतपत्रिकेमध्ये मत नोंदवून ती व्हाट्सअपद्वारे सोशल ग्रुप वर टाकली. याप्रकरणी या जवानाविरूद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जामनेर विधानसभा क्षेत्रामधील भारतीय सैन्यात असलेल्या जवानांना मतदानासाठी जामनेर मतदारसंघाचे डाक मतपत्रिका मतदान नोंदवण्यासाठी देण्यात येत आहे तसेच पहुर येथील सेनादलामधील जवान प्रमोद अशोक भामरे या जवानाला सुद्धा मतपत्रिका देण्यात आली होती. शनिवारी (दि.९) डाक मतपत्रिकाद्वारे मतदान नोंदवून. ती दुपारी एक वाजून बारा मिनिटांनी व्हाट्सअपच्या जामनेर या सोशल ग्रुपवर पाठवली. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचंद्र पवार गटाचे तालुका अध्यक्ष किशोर श्रीराम पाटील यांनी लेखी तक्रार केल्यावर निवासी नायब तहसीलदार व आचारसंहिता पथकांमधील प्रशांत रामराव निंबोळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामनेर पोलिसात गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.