जळगाव: आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनचे माजी अध्यक्ष तसेच रामदेवबाबा युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. एस. एस. मंथा आणि स्पेक्ट्रम इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीजचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक भूमिपुत्र मा. श्री. दीपक चौधरी हे २४ नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजी महाराज नाट्यमंदिर, महाबळ रोड, जळगाव येथे सकाळी १० वा. एसडी-सीड तर्फे दिल्या जाणाऱ्या १७ व्या मातोश्री प्रेमाबाई जैन उच्च शिक्षण शिष्यवृत्ती सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील व त्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान केली जाणार असून उपस्थित विद्यार्थ्यांना ते प्रेरणादायी व करिअरला दिशादर्शक मार्गदर्शन करणार आहेत.
एसडी-सीड मुळे हजारो विद्यार्थ्यांना यशाचा मार्ग खुला झाला आहे. प्रतिकूलता व आर्थिक दुर्बलतेचे दु:ख पचवत असतांनाच आर्थिक मदत व इतर अनेक विद्यार्थी हिताच्या योजनांद्वारे या विद्यार्थ्यांना एक आधाराचा हात व आत्मविश्वास मिळाला आहे.
सदर सोहळ्यास शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी, पालक, शिक्षक व प्राध्यापक, उद्योजक तसेच विद्यार्थी चळवळीशी संबंधित शिक्षणप्रेमी मान्यवरांनी या सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन एसडी-सीडच्या अध्यक्षा सौ. रत्नाभाभी जैन, कार्याध्यक्षा मीनाक्षीताई जैन, गव्हर्निंग बोर्ड चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी केले आहे.