जळगाव, ता.५ : कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे नुकतेच विद्यापीठस्तरीय युवारंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या विद्यापीठस्तरीय युवामहोत्सव स्पर्धेत जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला. या युवारंगात जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या संघाने १ सुवर्ण, १ रोप्य तर १ कांस्य पदकांवर आपली मोहोर उमटवली.
यात क्रीतिका राजेश कटपाल या विद्यार्थिनीने वेस्टर्न व्होकल सोलो या कला प्रकारात उत्कृष्ट सादरीकरण करत सुवर्ण पदक प्राप्त केले. रोनित सतीश नेवे, भूषण जगतराव पाटील, प्रणव विनोद इखे, प्रतिक भाऊराव दांडगे, जान्हवी देविदास चितळे व क्रीतिका कटपाल यांच्या संघाने वेस्टर्न ग्रुप सॉन्ग कलाप्रकारात उत्कृष्ट सादरीकरण करीत रोप्यपदक प्राप्त केले तर इंडियन क्लासिकल डान्स या स्पर्धेत अक्षया शशांक दानी हिला कांस्य तर स्वरांगी प्रमोद शार्वगी या विध्यार्थिनीला मराठी भावगीत स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले. या स्पर्धेत महाविद्यालयातील एकूण ३० विद्यार्थ्यांचा संघ सहभागी झाला होता. त्यात प्रतीक्षा जोशी, भाविका घाटे, कन्हेया चौधरी, रिया तळेले, इम्रान शेख व हितेश मोरे यांनी इतर कला प्रकारात उत्कृष्ट सादरीकरण केले. महाविद्यालयातील संघाने माईम, वाद-विवाद व वक्तृत्व स्पर्धेतसुद्धा ताकदीने सादरीकरण करून प्रेक्षकांची दाद मिळवली.
या संघाचे संघव्यवस्थापक व मार्गदर्शक म्हणून विध्यार्थी विकास अधिकारी प्रा. वसीम पटेल व संगीत समन्वयक प्रा.अक्षय दुसाने यांनी अथक परिश्रम घेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विध्यार्थ्यानी मिळवलेल्या या यशाबद्दल रायसोनी इस्टीट्यूट संस्थेचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व अकॅडमीक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी अभिनंदन केले.