जळगाव : मुक्ताई कॉलनी परिसरातील आधार जेष्ठ नागरिक संघात दिवाळीनिमित्त ‘स्वरवेध फाउंडेशन तर्फे “सांज पाडवा” हा सुंदर भावगीत व भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
प्रथम ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉ संभाजी देसाई यांनी सर्व गायक वृदांचे स्वागत करून प्रास्ताविकेत संघाच्या वाटचालीविषयी माहिती सांगितली.
तसेच ऑक्टोबर महिन्यातील जेष्ठांचे वाढदिवस निमित्त श्री साहेबराव देवराम पाटील यांनी संघाला 11000 रु. देणगी दिल्या बद्दल सत्कार करण्यात आला श्री संजीव कुलकर्णी यांचा गौरव करण्यात आला.भागवत पाटील,निळकंठ कासार प्रा.राजेंद्र देशमुख तसेच सर्व वाद्यववृंदाचा गौरव करण्यात आला.
नंतर “आली माझ्या घरी ही दिवाळी”. अशा प्रकारे सुंदर भजन व भावगीते सादर करून ज्येष्ठांचे मनोरंजन केले. सचिव प्रकाश पाटील यांनी सूत्रसंचालन केले. श्री. गजानन देशमुख, शरद पाटील,मोहन खैरनार, पंढरीनाथ साळुंखे, शेखर पाटील, डी.डी.पाटील, नामदेव पाटील, अनंतराव मगरे, प्रा.सुनील गरुड, कमलौ.शांताताई वाणी. कमलाकर वाणी यांनी सहकार्य केले..