विदगाव /जळगाव, दि. ३ – भाऊबीज हा सण बहिण-भावाच्या प्रेमळ नात्याचा उत्सव म्हणून साजरा केला जातो, आणि यावर्षी, महायुतीचे उमेदवार व शिवसेना नेते, मुलुख मैदान तोफ गुलाबराव पाटील यांनाविदगाव- फुपणी – गाढोदा परिसरातील शेकडो लाडक्या बहिणींनी स्नेहपूर्वक औक्षण केले. गुलाबभाऊ आमच्यासाठी फक्त राजकीय नेते नाहीत, तर खरेखुरे भाऊ आहेत, ज्यांनी गावातील प्रत्येकाच्या हितासाठी आपले जीवन समर्पित केले आहे.’ ”या औक्षणाच्या सोहळ्यात बहिणींनी आपल्या गुलाब भाऊंच्या विजयाची प्रार्थना करत, “गुलाबभाऊंचा विजय हीच आमच्यासाठी भाऊबीजेची खरी भेट असेल,” असे सांगून “आम्ही सर्व बहिणी गुलाबराव पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणार असल्याचे भावनिक उद्गार व्यक्त केले. भाजपाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. प्रमुख ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, शिवसेना जिल्हाध्यक्ष निलेश पाटील, रिपाईचे अनिल अडकमोल, महिला आघाडीच्या सरिता ताई कोल्हे – माळी आदी सोबत होते.
औक्षणाच्या या भावस्पर्शी सोहळ्यात गुलाबराव पाटील यांनी आपल्या बहिणींना दिलासा देत सांगितले, “तुमच्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही. “लाडक्या बहिणींचा पाठींबा म्हणजे माझ्यासाठी 100% विजयाची गॅरंटी असल्याचे सांगितले. उपस्थित महिलांनी गुलाब भाऊंच्या वरचा आपुलकीचा भाव व्यक्त करत त्यांच्या समाजसेवेचे आणि निस्वार्थ कार्याचे कौतुक केले. यावेळी उपस्थित महिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटले हिते.
शिवसेनेचे प्रभावी नेते गुलाबराव पाटील यांचा प्रचाराचा झंझावात विदगाव पंचायत समिती गणातील गाधोदा, देवगाव, फुपणी, नंदगाव, फेसर्डी, पिलखेडा, रिधुर, डीकसाई, विदगाव आवार, तुरखेडा या परिसरात संपन्न झाला. यावेळी काढण्यात आलेल्या भव्य रॅलीत मोठ्या संख्येने महिलांचा उस्फूर्त उत्साहाने सहभाग दिसून आला. यावेळी आमचा गुलाबभाऊ मोठ्या लिडने निवडून येणारच अशी चर्चा प्रचारा दरम्यान जेष्ठ नागरिक व महिला करत होते.
या प्रसंगी पं. स. सभापती ललिता ताई कोळी, जनाआप्पा कोळी, राजेंद्र कोळी, डॉ. कमलाकर पाटील, तालुकाध्यक्ष भूषण पवार, भाजपाचे तालुकाध्यक्ष हर्षल चौधरी, राजू सोनवणे, मिलिंद चौधरी, संजय भोळे, सुदाम राजपूत, ललित बराटे, भाऊसाहेब पाटील, मनोहर पाटील, सचिन पवार, सेनेचे भरत बोरसे, मुरलीधर अण्णा पाटील, संदीप पाटील, विभाग प्रमुख गजानन सोनवणे, चुडामण कोळी, दिलीप जगताप भगवान कुंभार, बळराम कोळी, ईश्वर कोळी, मुरलीधर कोळी, पुंडलिक कोळी, सरपंच नितीन सपकाळे, जितू पाटील, सरपंच भगवान कोळी, निलेश सपकाळे, शालिक कोळी, राजेंद्र चौधरी, सुनील कोळी, संजय कोळी, भुवनेश्वर चव्हाण, चेतन पवार, नवल राजे पाटील, गुड्डू सपकाळे, बापू कोळी, नरेंद्र सपकाळे यांच्यासह विदगाव व परिसरातील महिलांसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.