जळगाव – लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार करणार्या समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांवर रामानंद पोलिस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून यामुळे खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी की फिर्यादीत तरुणीने म्हटले आहे की, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक योगेश पाटील यांनी लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केला. तसेच योगेश पाटील यांच्या पत्नीने मारहाण करुन पाटील यांच्या वडीलांनी घरातून हाकलून देण्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या संदर्भात रामानंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास स.पो.नि. सचिन बेंद्रे करीत आहेत.