Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिवसेना आमदार किशोर पाटीलांचा “निर्धार मेळावा”, भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची मात्र दांडी

पाचोरा - भडगाव विधानसभा मतदार संघात भाजपाच्या मनात नेमका कुठला 'निर्धार '

najarkaid live by najarkaid live
October 8, 2024
in Uncategorized
0
राज्यातील ज्येष्ठांना तीर्थक्षेत्रांची मोफत यात्रा;मुख्यमंत्री  शासन निर्णयाचे आ.किशोर आप्पा पाटील यांनी केले स्वागत
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव,(प्रविण सपकाळे)- आमदारकीच्या कार्यकाळात पाचोरा भडगाव विधानसभा मतदार संघात शासनाचा प्रचंड निधी आणत खऱ्या अर्थाने ‘विकास गंगा’ आणून जनतेत ‘कार्यसम्राट‘ आमदार म्हणून नाव लौकिक असणारे शिवसेनेचे आमदार किशोरअप्पा पाटील यांनी आयोजित केलेल्या ‘निर्धार मेळाव्याला मात्र मित्र पक्ष असलेल्या भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ‘दांडी’ मारल्याने पाचोरा – भडगाव मतदार संघात भाजपा नेमका कुठला ‘निर्धार’ करत असल्याची राजकीय चर्चा होतं आहे.

भाजपाच्या या कृतीवर पालकमंत्री गुलाबराव पाटलांकडून उघड नाराजी 

पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांच्यावतीनं “निर्धार मेळावा” आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांना देखील आमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाला दांडी मारली. याच मुद्यावरुन शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी  नाराजी व्यक्त केली आहे. मेळाव्यामध्ये जे घडलं ते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि गिरीश महाजन यांच्याकडे मांडणार असल्याचं ते म्हणाले.

भाजपा – शिवसेना पक्षात दुरावा?

पाचोरा – भडगाव विधानसभामध्ये आमदार किशोरअप्पा पाटील व भाजपाचे अमोल शिंदे यांच्यात राजकीय वैर असल्याचं सर्वश्रुत आहे. गेल्या विधानसभा निवडणूकीत दोघे आमने सामने निवडणुक लढवीली होती त्यात किशोरअप्पा यांनी विजय मिळवला होता.अमोल शिंदे हे भाजपचे पाचोरा तालुक्याचे नेतृत्व करतात तर मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय आहेत दरम्यान विधानसभा  निवडणुकीपूर्वीच पाचोरा भडगाव मतदारसंघात भाजप शिवसेनेत दुरावा असल्याचं पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे. पाचोरा येथे आयोजित शिंदे सेनेच्या निर्धार मेळाव्याला भाजप पदाधिकाऱ्यांना निमंत्रण देवून ही त्यांनी गैर हजेरी लावल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी आपल्या भाषणात खंत व्यक्त केली आहे, आगामी विधानसभा निवडणुकीत वरिष्ठ नेते पाचोरा भडगाव विधानसभा मतदार संघातील भाजपा – शिवसेना पदाधीकारी यांच्यातील दुरावा कसा दूर करतील व आमदार किशोरअप्पा पाटील यांचा विधानसभेत जाण्याचा मार्ग कसा मोकळा करतील याकडे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

भाजपच्या मनात नेमकं काय?

शिवसेनेचे आमदार किशोरअप्पा पाटील दोन टर्म पासून विधानसभेचे प्रतिनिधित्व करत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय असल्याने आपल्या मतदार संघात मोठा निधी उपलब्ध करून विकास केला खरं, मतदारांची मन जिंकण्यातही आमदारांना यश आलं असताना मित्र पक्ष मात्र पाचोऱ्यात साथ देतांना दिसत नाही. निर्धार मेळाव्याला मित्र पक्ष म्हणून भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी येणे अपेक्षित होते मात्र भाजपने दांडी मारून या मतदार संघात भाजपाच्या मनात नेमकं काय सुरु आहे अशीच चर्चा घडवायला भाजपानं भाग पाडलं आहे.गेल्या विधानसभेत किशोरअप्पाच्या समोर तगडं आव्हान उभं करण्यात आलं होतं आताही तेचं होणार का? तसं झालं तर पाचोऱ्यात त्रिशंकू निवडणुका होतील असंच चित्र दिसत आहे. भाजपा शिवसेनाच्या वरिष्ठ नेत्यांना या दोन नेत्यातील दुरावा कमी करण्यात किती यश येईल हे लवकरच स्पष्ट होईल.

लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजपा एक संघ होते म्हणून देशात विपरीत वातावरण असताना सुद्धा जळगाव जिल्ह्यात दोन्ही जागा आपल्या निवडून आल्या आहेत, अशी आठवण देखील गुलाबराव पाटील यांनी भाजप नेत्यांना करुन दिली.लोकसभेप्रमाणं जर आपण विधानसभेत एकसंध राहिलो तर जळगाव जिल्ह्यातील 11 ते 11 जागा निवडून येऊ शकतात, असंही पाटील म्हणाले. मात्र, आपल्यात फूट असणं हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकसानीचे आहे, असा इशारा देखील पाटील यांनी दिला.दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील भाजप आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये दिलजमाई होणार का हे येत्या दिवसांमध्ये पाहायला मिळेल.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

होय मी शंभर टक्के निवडणूक लढणार – अमोल शिंदे

Related Posts

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
ॲड.आनंद मुजुमदार यांना भारत सरकारकडून अधिकृत नोटरी पदाची नियुक्ती

ॲड.आनंद मुजुमदार यांना भारत सरकारकडून अधिकृत नोटरी पदाची नियुक्ती

May 30, 2025
शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

May 5, 2025
कृषिक्षेत्रातील भविष्य अधोरेखित करणारे फालीचे जैन हिल्स येथे २७ एप्रिलपासून अकरावे अधिवेशन

कृषिक्षेत्रातील भविष्य अधोरेखित करणारे फालीचे जैन हिल्स येथे २७ एप्रिलपासून अकरावे अधिवेशन

April 26, 2025
लोहारा येथे बारागाड्या ओढल्या जाणार ! अखंडपणे पन्नास वर्षांची परंपरा कायम!

लोहारा येथे बारागाड्या ओढल्या जाणार ! अखंडपणे पन्नास वर्षांची परंपरा कायम!

April 11, 2025
Next Post
होय मी शंभर टक्के निवडणूक लढणार – अमोल शिंदे

होय मी शंभर टक्के निवडणूक लढणार - अमोल शिंदे

ताज्या बातम्या

आता रेल्वे आरक्षणाचा Final Chart होणार 8 तास आधी तयार होणार

आता रेल्वे आरक्षणाचा Final Chart होणार 8 तास आधी तयार होणार

July 1, 2025
त्याच्या डोक्यातील संशयाचे भूत काही जाता जात नव्हते ,अखेर पत्नी गाढ झोपेत असतांना पतीने केला भयानक शेवट!

Thrissur Crime: प्रेमसंबंध, ब्लॅकमेल आणि दोन निष्पाप जीवांचा क्रूर अंत

July 1, 2025
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा Political Twist!

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा Political Twist!

July 1, 2025
खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

June 30, 2025
तुमची स्मरणशक्ती कमजोर वाटतेय का? लक्ष एकाग्र होत नाही? तर ‘हे’ तीन मेंदूचे व्यायाम तुमच्यासाठीच आहेत!

तुमची स्मरणशक्ती कमजोर वाटतेय का? लक्ष एकाग्र होत नाही? तर ‘हे’ तीन मेंदूचे व्यायाम तुमच्यासाठीच आहेत!

June 30, 2025
₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

June 30, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us