जळगाव, (प्रतिनिधी)- शेती व त्यातील शाश्वत विकासातील सातत्य व महत्वपूर्ण योगदानाबद्दल जैन इरिगेशन सिस्टिम्स ली चे उपाध्यक्ष अनिल जैन यांना डॉ. डी. वाय. पाटील कृषी व तांत्रिक विद्यापीठ , कोल्हापूर ने डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी जाहीर केली आहे. येत्या सोमवारी होणाऱ्या विद्यापीठाच्या पहिल्या पदवीदान समारंभात श्री. जैन यांना ही पदवी प्रदान करण्यात येणार आहे..