मुक्ताईनगर– बोदवड तालुक्यातील जुनोने येथील तरुणांनी माजी महसुल मंत्री आ .एकनाथराव खडसे साहेब यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला यावेळी आ.एकनाथराव खडसे साहेबांनी प्रवेश घेणाऱ्या तरुणांच्या गळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा रुमाल टाकून त्यांचे पक्षात स्वागत केले
प्रवेश घेणाऱ्या तरूणांमध्ये
चेतन पाटील, सोनू पाटील, शुभम पाटील, कुणाल पाटील, पवन पाटील, गजानन पाटील, वैभव पाटील, रमेश पाटील, विनोद पाटील ,ओमप्रकाश पाटील, शिवाजी पाटील, साहेबराव पाटील, ओम पाटील, गजानन पाटील, सागर पाटील, मारुती पाटील, नामदेव पाटील, हेमंत पाटील, डीगंबर येळे, सोपान पाटील, सुरेश पाटील यांचा समावेश आहे
याप्रसंगी आ .एकनाथ खडसे म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा छञपती शिवराय, छञपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी आणि लोकाभिमुख विचारांवर चालणारा पक्ष असून संविधानाचा आदर, लोकशाही मूल्यांचे जतन करणारा, समाजातील वंचीत घटकांप्रती सामाजिक न्यायाची भावना जपणारा शेतकरी, कष्टकरी,महिला, तरुण यांचे हित जपणारा पक्ष असून
या पक्षात सर्व जातिधर्म , गोरगरिब यांना न्याय आणि नेतृत्वाची संधी मिळते मा.शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची दमदार वाटचाल सुरू आहे.आगामी विधानसभा निवडणुकीत
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा झेंडा फडकवायचा आहे त्यासाठी सर्वांनी एकजुटीने मेहनत घेण्याचे आ. एकनाथराव खडसे यांनी तरुणांना आवाहन केले तसेच
जुनोने गावातील विकासकामांसाठी आतापर्यंत निधी दिला असुन आगामी काळात सुद्धा राहिलेले विकास कामे पुर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे आ. एकनाथराव खडसे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले
यावेळी राजु माळी, शरीफ मेकॅनिकल, संजय पाटिल, निलेश पाटिल, बबलू सापधरे,भैय्या पाटिल, उपस्थित होते