एका २३ वर्षीय तरुणीचा हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत सेक्स केल्यानंतर अति रक्तस्त्राव होऊन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुजरातमधून समोर आली आहे. तरुणीला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होतं असतांना तिच्या बॉयफ्रेंडने तीला तात्काळ हॉस्पिटलात न नेता ‘इंटरनेटवर ‘सेक्स केल्यानंतर रक्तस्त्राव झाल्यास काय करावे?’हे सर्च करत होता.दरम्यान तरुणीला अति रक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला.सदर घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
बॉयफ्रेंडने रुग्णवाहिकेला फोन करण्यापेक्षा मित्राला फोन करणे पसंत केलं. तरुणीचा रक्तस्त्राव जास्त होत होता, तरी तो ऑनलाईन उपाय शोधण्यात व्यस्त होता. त्याने काही वेळ कपड्याने रक्तस्त्राव थांबवण्याचा प्रयत्न केला. पण, त्याने काही झालं नाही. काही वेळाने तरुणी बेशुद्ध पडली.
तरुणी बेशुद्ध पडल्यानंतर बॉयफ्रेंडने मित्राला फोन करून हॉटेलवर बोलावून घेतले. त्याने देखील कपड्याने रक्तस्त्राव थांबवण्याचा प्रयत्न केला. बेशुद्ध तरुणीला त्यानंतर खासगी वाहनातून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. याच दरम्यान तिचा मृत्यू झाला. हॉस्पिटलमध्ये नेत असताना बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या आई-वडिलांना फोन केला. पण, ते जोपर्यंत हॉस्पिटलमध्ये पोहोचले तोपर्यंत त्यांच्या मुलीचा मृत्यू झाला होता.
टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील रिपोर्ट दिला आहे. याप्रकरणी २६ वर्षीय बॉयफ्रेंडला निष्काळजीपणा करणे आणि गर्लफ्रेंडला तात्काळ हॉस्पिटलमध्ये घेऊन न जाणे या कारणासाठी अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. बॉयफ्रेंडने तात्काळ तिला ह़ॉस्पिटलमध्ये नेलं असते तर कदाचित तिचा जीव वाचला असता. पोलिसांच्या माहितीनुसार, बॉयफ्रेंड ६० ते ९० मिनिट ऑनलाईन उपाय शोधण्यात व्यस्त होता.