जळगाव,(प्रतिनिधी)- गुजरात राज्यातून महाराष्ट्रातील नंदुरबार , धुळे, जळगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बनावट खते शेतकऱ्यांना विक्री हेतू उपलब्ध होत असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
दरम्यान त्या अनुषंगाने विकास पाटील, संचालक
(गुण नियंत्रण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी आवाहन केल्यानुसार गुजरात राज्यातील अवैध, विनापरवाना व बनावट खतांना आळा घालण्यासाठी नाशिक विभागातील गुण नियंत्रण शाखेने धडअ तपासणी सुरु केल्या आहेत.शुक्रवार दिनांक २०.०९.२०२४ रोजी जळगाव जिल्हा भरारी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नांद्रा ता.जि.जळगाव येथे गुजरात राज्यातील खत कंपनी शेतक-यांना विक्री हेतु येणार असल्याचे समजले.
त्यानुसार जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे यांनी धिरज बढे, कृषी अधिकारी पंचायत समिती, जळगाव व अमित भामरे, मंडळ कृषी अधिकारी, जळगाव यांच्या पथकाने पाळत ठेवून ट्रक मधुन मे.जेनिक केमटेक कॉर्पोरेशन कंपनीचे नाव लिहिलेल्या सेंद्रिय खताच्या १५२ गोण्या शेतकऱ्यांच्या बांधावर उतरवत असताना छापा टाकून जप्त केल्या.
या सेंद्रिय खतांच्या बॅगवर मे.जेनिक केमटेक कॉर्पोरेशन या खत कंपनीचे बोगस नाव टाकून शेतकऱ्यांना विक्री हेतू विक्री केली आहे .
मे.दक्षकमल ट्रेडर्स, शहादा जि. नंदुरबारचे मालक संशयित चंद्रकांत पाटील हे में. जेनिक केमटेक कार्पोरेशन या कंपनीचे नाव टाकून सेंद्रिय खत शेतकरी बांधवांना विक्री करत होते.
याप्रकरणी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक
श्री.विकास बोरसे यांनी
मा.रविशंकर चलवदे,विभागीय कृषी सहसंचालक नाशिक ,मा.प्रवीण देशमुख मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी पुणे,
मा.कुर्बान तडवी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव, मा.सुरज जगताप कृषी विकास अधिकारी (जि प) जळगाव, विजय पवार मोहिम अधिकारी जळगाव,नितेंद्र पानपाटील, तंत्र अधिकारी (गु.नि), विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध ,बनावट व विनापरवाना खत विक्री करणाऱ्या मे.दक्षकमल ट्रेडर्स,शहादा जि.नंदुरबार यांचे मालक चंद्रकांत पाटील,जोधा पंपारीया
भरतभाई, दिनेश पाटील यांच्या विरोधात अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५, खत नियंत्रण आदेश १९८५ अन्वये जळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
या कारवाईमुळे गुजरात येथून बोगस निविष्ठा आणून त्या शेतकरी बांधवांना विक्री करणाऱ्या कंपन्यांचे धाबे दणाणले आहे.
नाशिक विभागात अशा प्रकारच्या बोगस निविष्ठा विक्री करणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात गुण नियंत्रण शाखेने धडक कारवाई सुरू केली असून याबाबत कुणाचीही गय केली जाणार नाही असे आवाहन मा.रविशंकर चलवदे, विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग नाशिक यांनी दिले आहे.