मुंबई,(प्रतिनिधी)- मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट) निवडणुका स्थगित करण्याबाबत दिनांक 20 सप्टेंबर रोजी परिपत्रक काढण्यात आले असून सिनेट निवडणुका स्थगितीसाठी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासू) मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिका दाखल केली होती दरम्यान न्यायमूर्ती चांदुरकर व पाटील यांच्या दुहेरी खंडपीठाचे मुंबई विद्यापीठाने प्रशासनाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देताच विद्यापीठ प्रशासन बॅफूटवर जात सिनेट निवडणुका स्थगित करण्यात आल्याचे मासू विद्यार्थी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. सिद्धार्थ इंगळे यांनी सांगितलं आहे.
लोकशाही प्रक्रियेद्वारे पर्याप्त प्रतिनिधी तत्वाची मागणी
मासू विदयार्थी संघटनेने दाखल केलेल्या याचिकेत नोंदणी शुल्कासह निवडणूक प्रक्रियेत असलेल्या त्रुटी, प्रक्रियेतील अनियमितता, पारदर्शकतेचा अभाव आणि राजकीय हस्तक्षेपावर जोर दिला आहे. निवडणूक प्रक्रियेच्या घटनात्मक वैधतेबद्दलही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. विशेषत: जुलै 2023 च्या 90,000 नोंदणीकृत मतदारांची संख्या 31 जुलै 2024 च्या अंतिम मतदार यादीत 13,000 पर्यंत कमी होण्याची बाब संशयास्पद असल्याचं मासू संघटनेन निदर्शनात आणून दिले आहे.
स्थगितीचे आदेश वाचा
मुंबई विद्यापीठ
परिपत्रक क्र.नि./आय.सी.डी./२०२४-२५/३४५
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम २८ (२) (न) (28 (2)(t)] प्रमाणे (१०) नोंदणीकृत पदवीधरांच्या संघाच्या निवडणूकीची निवडणूक अधिसूचना दिनांक ३ आगस्ट, २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर अधिसूचनेमध्ये नोंदणीकृत पदवीधर मतदार संघाची निवडणूक दिनांक २२ सप्टेंबर २०२४ रोजी होती.
उपरोक्त निवडणुकीच्या अनुषंघाने संबंधित मतदारांना, उमेदवारांना, निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेत्या निवडणुक अधिकारी, मतदान केंद्र प्रमुख, अधिकारी व कर्मचारी वर्गाला कळविण्यात येते की, महाराष्ट्र शासना कडून प्राप्त झालेल्या आदेशानुसार दिनांक २२ सप्टेंबर २०२४ रोजी होणारी नोंदणीकृत पदवीधर मतदार संघाची निवडणूक शासनाकडून पुढील आदेश प्राप्त होई पर्यंत स्थगित करण्यात येत आहे.
या बाबत ची नोंद सबंधित मतदारांनी, उमेदवारांनी, निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या निवडणुक अधिकारी, मतदान केंद्र प्रमुख, अधिकारी व कर्मचारी वर्गानी घ्यावी ही विनंती
स्वाक्षरीत/-
कुलसचिव
तथा निवडणूक निर्णय अधिकारी