जळगाव,(प्रतिनिधी)- राज्यासह जळगाव जिल्ह्यात महिलासंह मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अशातच एका १९ वर्षीय तरुणीला घरी बोलावून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना चाळीसगाव तालुक्यातून समोर आली आहे, याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात एकावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत असे की, चाळीसगाव तालुक्यातील एका गावात १९ वर्षीय तरूणी आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. दरम्यान, गावातील समाधान शेळके याने पीडितेला घरी बोलावून तिच्यावर अत्याचार केला तसेच हा प्रकार कुणाला सांगितला तर जीवेठार मारिन, अशी धमकी दिली.
दरम्यान, १६ रोजी सायंकाळी ७ वा. समाधान शेळके याने दारू पिऊन पुन्हा पीडित तरूणीचा हात पकडून अंगावर ओढले. संतापजनक म्हणजे, हा प्रकार पीडित तरूणीच्या आई-वडीलांसमोरच घडला.
याबाबत पिडीतेने चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार समाधान शेळके याच्याविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुणाल चव्हाण हे करीत आहे.