भारतीय रेल्वे सेवेत नोकरी (Railway Recruitment) करण्याची इच्छा मनात बाळगून असलेल्या इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी महत्वाची बातमी असून रेल्वे भरती मंडळाने (RRB) नॉन-टेक्निकल पॉपुलर श्रेणी (NTPC 2024 Vacancies) 2024 अंतर्गत पदवीधर आणि विनापदवीधर ( Undergraduate Level Posts) तरुणांसाठी नोकरभरती (RRB NTPC 2024) काढली असून 11558 एवढ्या रिक्त जागा यावेळी भरती प्रक्रियेतून भरणार आहेत.
Railway Recruitment NTPC
शनिवार, 14 सप्टेंबर पासून भरती प्रक्रिया सुरु झाली असून उमेदवार आपले अर्ज अधिकृत संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाईन सादर करू शकतात. एकूण पदसंख्या, अर्ज भरण्याची प्रक्रिया, मुदत आणि पात्रता व इतर तपशील जाणून घेण्यासाठी खालील माहिती आपल्या कामी येऊ शकते.
रेल्वे भरती अर्ज भरण्याची अंतिम मूदत
- अधिकृत अधिसूचनेनुसार, रेल्वे भरती प्रक्रिया 11,558 पदांसाठी पार पडेल. ज्यामध्ये पदवी असलेल्या आणि नसलेल्या उमेदवारांनाही पदाची आर्हता आणि निकष, पात्रतेनुसार सरकारी नोकरीची संधी मिळेल.
- एकूण 11,558 अधिसूचित रिक्त पदांपैकी 8,113 पदवीधर स्तरावरील तर 3,445 पदवीधर स्तरावरील पदांसाठी आहेत
- पदवीधर पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 14 ते 13 ऑक्टोबर दरम्यान आणि विनापदवीधर पदांसाठी अर्ज प्रक्रिया 21 सप्टेंबरपासून सुरू होईल आणि 20 ऑक्टोबरला संपेल.
- उमेदवार आपले अर्ज अधिकृत संकेतस्थळ rrbapply.gov.in. च्या माध्यमातून ऑनलाईन सादर करू शकतात.
पदवीधर स्तरावरील रिक्त पदे:
- मुख्य व्यावसायिक सह तिकीट पर्यवेक्षक: 1,736 रिक्त जागा
- स्टेशन मास्टर: 994 जागा
- मालगाडी व्यवस्थापक: 3,144 जागा
- कनिष्ठ खाते सहाय्यक सह टंकलेखक: 1,507 जागा
- वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक: 732 जागा
विनापदवीधर स्तरावरील रिक्त पदे:
- व्यावसायिक सह तिकीट लिपिक: 2,022 जागा
- लेखा लिपिक सह टंकलेखक: 361 जागा
- कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक: 990 जागा
- रेल्वे लिपिक: 72 जागा
अर्ज शुल्क आणि उमेदवारांसाठी सूचना:
शुल्क: अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, माजी सैनिक, महिला, पीडब्ल्यूबीडी, ट्रान्सजेंडर, अल्पसंख्याक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय (ईबीसी) उमेदवारांसाठी 250 रुपये. इतर सर्व अर्जदारांसाठी 500 रुपये. सूचना: अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर सविस्तर सूचना वाचावी. भारतीय रेल्वेमध्ये विविध भूमिकांसाठी योग्य उमेदवारांची निवड करण्यासाठी भरती प्रक्रियेमध्ये संगणक आधारित चाचण्या (सीबीटी) आणि कौशल्य चाचण्या समाविष्ट असतील. परीक्षेच्या तारखा आणि निवड प्रक्रियेसह भरती प्रक्रियेबद्दल अधिक अद्ययावत तपशीलांसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. दरम्यान, प्रदीर्घ काळानंतर इतक्या मोठ्या प्रमाणावर भरती निघाली आहे. त्यातच पदवी प्राप्त आणि पदवी नसलेल्या निघाली आहे. त्यातच पदवी प्राप्त आणि पदवी नसलेल्या उमेदवारांनाही या भरतीमध्ये संधी असल्यने अनेक तरुणांचे सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे.