जळगाव दि. 16 (प्रतिनिधी) – जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव जिल्हयामध्ये महाराष्ट्रातील युवक युवतींना शासकीय व खाजगी आस्थापना /उद्योजक यांच्याकडे प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” चा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहे. उमेदवारांना प्रशिक्षण देऊन औद्योगिक आणि बिगर औद्योगिक आस्थापनामध्ये प्रत्यक्ष कामांद्वारे प्रशिक्षण, गरजु युवकांना रोजगाराची संधी, तसेच उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध व्हावे हा योजनेचा उद्देश आहे.
या योजनेचा शासन निर्णय निर्गमित झाल्यापासुन प्रथम टप्प्यात शासकीय/निमशासक आस्थापना मध्ये प्राधान्याने उमेदवार रुजु करण्यावर भर देण्यात आला होता व त्या अनुषंगाने काही आस्थापनेत उमेदवार रुजु सुद्धा झालेले आहेत. तथापि शासनाच्या मुळ उद्देशाप्रमाणे सदर योजना यशस्वीरित्या राबविण्यासाठी व योजनेचा अधिकाधिक प्रशिक्षणार्थ्यांना लाभ व्हावा व जास्तीत जास खाजगी आस्थापना /उद्योग या योजनेत सहभागी व्हावेत या उद्देशाने मेळावा आयोजित करण्यात येत आहेत
यास्तव, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय टी आय प्रत्येक तालुक्याच्या ठीकाणी दिनांक २३ सप्टेंबर २०२४ रोजी मेळाव्यांचे आयोजन करण्यांत आलेले आहे. नोकरी इच्छुक उमदेवारांसाठी ही एक सुवर्णसंधी असून सर्वसाधारण १२ वी, सर्व पदवीधारक/आय टी आय सर्व ट्रेड धारक / सर्व डिप्लोमा धारक उमदेवारंनी या संधीचा लाभ घ्यावा, व याबाबत काही तांत्रिक अडचणी आल्यास अथवा अधिकच सहाय्यासाठी सोमवार ते शुक्रवार (सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून) या कालावधीत सकाळी ०९.४५ सांयकाळी ०६.१५ वाजेपर्यंत स्थानिक जळगाव कार्यालयाशी ०२५७-२९५९७९० वर कार्यालयीन वेळेत दूरध्वनीद्वारे किंवा प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन रविकुमार पतंम, प्र. सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी केले आहे.