Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सरकारने शेण खाण्याचे टाळून पुतळा श्रद्धेने निष्ठेने उभारला असता तरी ही दुर्दैवी घटना घडली नसती

शिवसेनेचे मा.खासदार उन्मेशदादा पाटील यांचे खणखणीत प्रतिपादन

najarkaid live by najarkaid live
September 1, 2024
in Uncategorized
0
सरकारने शेण खाण्याचे टाळून पुतळा श्रद्धेने निष्ठेने उभारला असता तरी ही दुर्दैवी घटना घडली नसती
ADVERTISEMENT
Spread the love

चाळीसगाव – राज्य सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करीत आहे. आपल्या नेत्यांना खुश ठेवण्यासाठी अत्यंत घिसाडघाईने मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारण्यात आला. माञ शिवरायांचा पुतळा कोसळल्याने मराठी अस्मितेला ठेच लागली आहे .घरातील एखादी प्रतिमा जरी फुटली तरी मनाला वेदना होणाऱ्या मराठी अस्मितेच्या भावना या दुर्दैवी घटनेने अनावर झालेल्या आहेत.राज्य सरकारने पुतळा उभारणीत शेण खायचे टाळले असते हा प्रकार घडला तो घडला नसता मात्र राज्य सरकारचे छत्रपती शिवाजी महाराजांवरचे प्रेम बेगडी असून जिल्हयातील नेत्यांनी साधा निषेध नोंदविला नाही. याचा शिवप्रेमींमध्ये तीव्र संताप आहे. आता या मिंधे सरकारचे घडे भरले असून सरकारला हद्दपार करण्यासाठी त्यांचा शिवप्रेमींनी राज्य सरकारचा अंत्यविधी केला असल्याची गर्जना शिवसेना पक्षाचे मा.खासदार उन्मेशदादा पाटील यांनी व्यक्त केली आहे.

राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ चाळीसगाव तालुका व शहर परिसरातील शिवप्रेमी संघटना संस्था यांच्यावतीने राज्य सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. दुपारी बारा वाजता शहरातील शिवाजी घाट येथून ही अंत्ययात्रा तहसील कार्यालय मार्गे छत्रपती शिवाजी चौकात आली. यावेळी राज्य सरकार मुर्दाबादाच्या घोषणा देत शिवप्रेमींनी शहर दणाणून सोडले.

शिवप्रेमींच्या भावना अनावर
छत्रपती शिवाजी महाराज चौकात अंत्ययात्रा आल्यानंतर या ठिकाणी शिवप्रेमींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.सह्याद्री प्रतिष्ठानचे दिलीप घोरपडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, शिवप्रेमी समाधान पाटील, संभाजी सेनेचे संस्थापक लक्ष्मण शिरसाठ,काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष अनिल निकम, पिपल्स फाउंडेशनचे आकाश पोळ, शेतकरी कामगार पक्षाचे गोकुळ पाटील,आम आदमी पक्षाच्या कोमलताई मांडोळे, युवक काँग्रेस पक्षाचे आदित्य पवार,महिला काँग्रेसच्या अर्चना पोळ, युवक काँग्रेसचे चंद्रकांत ठोंबरे,ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेंद्र पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांच्यासह माजी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी मनोगत व्यक्त करीत राज्य सरकारचा धिक्कार केला.या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला.

प्रतिमात्मक अंत्ययात्रेने शहरवासीयांचे लक्ष वेधले
खान्देश रिलस्टार दीपक खंडाळे यांनी अंत्ययात्रेत आग्याची भूमिका बजावत अग्निडाग दिला.लाडक्या बहिणींनी राज्य सरकारच्या अंत्ययात्रेला वाऱ्यावर सोडल्याची तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली. शहरातील शिवप्रेमी संघटना, संभाजी सेना व सह्याद्री प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या अंतिमयात्रेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. शिवाजी घाट येथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण केल्यानंतर अंत्ययात्रा सुरुवात झाली ही अंत्ययात्रा तहसील कचेरी स्टेशन रोड मार्गे छत्रपती शिवाजी मार्गावर आणण्यात आली. शितला मंदिराच्या साक्षीने विसावा देण्यात आला. या प्रतीकात्मक अंत्ययात्रेत शिवप्रेमींनी आपल्या अनावर झालेल्या भावना तिरडी जवळ शोक करीत व्यक्त केल्या.

दैवताचा झालेला अपमानाचा बदला घेऊ
मा.खासदार उन्मेशदादा पाटील पुढे म्हणाले की राज्य सरकार चोर सोडून संन्याशाला फाशी देत आहे. वास्तविक पुतळा निर्मिती करताना विविध प्रकारच्या परिक्षणांना सामोरे जावे लागते मात्र वरिष्ठ नेत्यांच्या मर्जी संपादन करण्यासाठी घिसाडघाई करीत हा पुतळा उभारला. माञ या घटनेने मराठी अस्मिता यांनी वेशीला टांगण्याचे जे पाप केल आहे.त्याला शिवप्रेमी माफ करणार नाहीत.जगातील प्रत्येक मराठी माणूस या घटनेबद्दल दुःख व्यक्त करीत आहे .माञ चाळीसगावचा लोकप्रतिनिधी जो रायगड वारीसाठी मोठ्या प्रमाणात इव्हेंट करतो. मात्र या घटनेबद्दल त्यांनी साधा निषेध नोंदविला नाही.असा टोला देखील त्यांनी लगावला.

प्रतीकात्मक अंत्ययात्रेला तोबा गर्दी
आजच्या कार्यक्रमाला शिवसेनेचे तालुकाप्रमुख रमेश चव्हाण, शहर प्रमुख नानाभाऊ कुमावत, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष पत्रकार किसनराव जोर्वेकर,तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, शहराध्यक्ष श्याम देशमुख, नगरसेवक रामचंद्र जाधव, नगरसेवक दीपक पाटील, शेखर देशमुख,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल निकम, शहराध्यक्ष रवी जाधव, प्रदेश पदाधिकारी अशोक खलाणे,जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप देशमुख, देवेंद्र पाटील, नितीन परदेशी,रा.कॉ.युवक तालुकाध्यक्ष मोहित भोसले,शहराध्यक्ष शुभम पवार, शिवसेनेचे तालुका संघटक सुनिल गायकवाड,विधानसभा क्षेत्र प्रमुख भिमराव खलाणे,शिवशक्तीचे सुधाकर मोरे, माजी नगरसेवक संजय ठाकरे,उपशहर प्रमुख महेंद्र जयस्वाल, युवासेनेचे रवीभाऊ चौधरी,हर्षल माळी,सुरेश पाटील,किरण घोरपडे,नकुल पाटील,रॉकी धामणे, सचिन फुलवारी, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख मोहिनीताई मगर, तालुका प्रमुख सविताताई कुमावत, आशाताई माळी,शांताबाई नाईक, कांताबाई राठोड,उपतालुकाप्रमुख नाना शिंदे,देवचंद साबळे, हिंमत निकम,अनिल राठोड, रामेश्वर चौधरी,रमेश पाटील वाकडीकर, दिपक एरंडे,शेतकरी नेते ऍड.राजेंद्र सोनवणे, ऍड.साबीर सय्यद ऍड.राहुल पाटील,प्रज्वलसिंग जाधव,राहुल मोरे,प्रदेश प्रतिनिधी रवींद्र पोळ, जिल्हा उपाध्यक्ष अर्चना पोळ,पंचायत समितीचे माजी सभापती भाऊसाहेब पाटील, साहेबराव चव्हाण,संजय पाटील पातोंडा,रवीभाऊ चौधरी तरवाडे, बेलगंगेचे माजी संचालक बाळासाहेब पाटील, चांगदेव राठोड,भटक्याजाती सेना जिल्हाप्रमुख मारोती काळे,तालुकाप्रमुख अनिल चव्हाण, नगरसेवक गणेश महाले, पप्पू राजपूत,मनोज चौधरी, जावेद खान, नवाज शेख, समाधान पाटील, मुकेश गोसावी,लक्ष्मण गवळी, सारंग जाधव, संदीप ठुबे, संतोष पाटील, निलेश पाटील, समकित छाजेड, सामाजिक कार्यकर्ते नरेन काका जैन, अण्णा गवळी, अमित सुराणा, संभाजी सेनेचे शहर प्रमुख अविनाश काकडे,दिवाकर महाले, आबा सौंदाणे, अविनाश पाटील,काँग्रेसचे प्रा. नितीन सूर्यवंशी, प्रा सुवालाल सूर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष रमेश शिंपी, मंगेश अग्रवाल, पंकज शिरोडे, बापू चौधरी, आप्पा चौधरी,सुधाकर कुमावत, अमजद खान, गयास शेख,वाल्मीक महाले,मराठा सेवा संघाचे तालुकाप्रमुख कूणाल पाटील, तालुका सचिव तमाल देशमुख, शहर उपाध्यक्ष सुनील चव्हाण, किशोर पाटील, उपसरपंच नरेश साळुंखे, चेतन वाघ,प्रताप पाटील,शेतकरी संघटनेचे दिलीप पाटील, ऍड.राहुल पाटील, ऍड.प्रमोद अगोणे,सरपंच राजू मोरे, सामाजिक कार्यकर्ते खुशाल पाटील, सचिन पाटील सर, शेषराव चव्हाण, रवीआबा राजपूत, सामाजिक कार्यकर्ते उदय पवार, कचरू सोनवणे, माधव रणदिवे, कल्पेश मालपुरे, ऋषिकेश पाटील, गणेश महाजन,युवक काँग्रेसचे पंजाबराव देशमुख,गुंजन मोटे,हेमंत जाट, चेतन वाघ,उमेश आंधोळकर,लवेश राजपूत,गौरव पाटील आदी शिवप्रेमी उपस्थीत होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धरणगावात विद्यार्थी सेना शाखेच्या फलकाचे प्रतापराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन !

Next Post

महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरीजी महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त ३१ रक्तदात्यांनी केलं रक्तदान

Related Posts

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
ॲड.आनंद मुजुमदार यांना भारत सरकारकडून अधिकृत नोटरी पदाची नियुक्ती

ॲड.आनंद मुजुमदार यांना भारत सरकारकडून अधिकृत नोटरी पदाची नियुक्ती

May 30, 2025
शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

May 5, 2025
कृषिक्षेत्रातील भविष्य अधोरेखित करणारे फालीचे जैन हिल्स येथे २७ एप्रिलपासून अकरावे अधिवेशन

कृषिक्षेत्रातील भविष्य अधोरेखित करणारे फालीचे जैन हिल्स येथे २७ एप्रिलपासून अकरावे अधिवेशन

April 26, 2025
लोहारा येथे बारागाड्या ओढल्या जाणार ! अखंडपणे पन्नास वर्षांची परंपरा कायम!

लोहारा येथे बारागाड्या ओढल्या जाणार ! अखंडपणे पन्नास वर्षांची परंपरा कायम!

April 11, 2025
Next Post
महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरीजी महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त ३१ रक्तदात्यांनी केलं रक्तदान

महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरीजी महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त ३१ रक्तदात्यांनी केलं रक्तदान

ताज्या बातम्या

How to Earn Money from Home in 2025

घरबसल्या पैसे कसे कमवायचे? २०२५ मध्ये ऑनलाईन पैसे कमवण्याचे सर्वोत्तम मार्ग

July 1, 2025
Patanjali E-Bike 2025

पंतजलि ई-बाइक 2025: ₹7000 च्या आत भारतातील स्वस्त ई सायकल | Patanjali E-Bike Features

July 1, 2025
Diabetes Information in Marathi

डायबेटिस म्हणजे काय? कारणं, लक्षणं, आहार आणि घरगुती उपाय | Diabetes Information in Marathi

July 1, 2025
Horoscope Today – 1 जुलै 2025 राशी भविष्य मराठी

Horoscope Today: जुलै 1 पासून 6 राशींचे भाग्य उजळणार, काहींसाठी दिवस खडतर

July 1, 2025
एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

July 1, 2025
“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

July 1, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us