लोहारा ता. पाचोरा जि. जळगाव (रिपोर्टर ईश्वर खरे)-
लोहारा बस स्टॉप परिसरात सालाबादा प्रमाणे भारतीय जनता पार्टी तर्फे गोपाळकाला (दहीहंडी) उत्सव साजरा करण्यात आला.सुरुवातीला टेबल आंधी दहीहंडी फोडण्यात आली. व टेबल हंडी गोविंदाचा मान साई बापू चव्हाण यांनी मिळवला.या उत्सवात येथील पोलीस,आर्मी भरतीचा सराव करणारे मुले तसेच कुस्तीगीर पहिलवान ग्रुप स्वयंस्पृतिने सहभागी झाले.
भरपूर प्रयत्नाने पाच थरांचे मनोरे रचून गुणवंत कोळी याने दहीहंडी फोडून गोविंदाचा मान मिळवला. लोहारा सह परिसरातील लहान थोर अबाल वृद्ध या दहीहंडी उत्सवात सहभागी झाले.
तर जय अंबिका डफ मंडळ यांनी वाजंत्री वाजवुन सर्व गोपाळांचा उत्साह वाढवला. यावेळी आयोजक भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते शरद सोनार, सुनील क्षीरसागर, चंद्रकांत पाटील, रमेश शेळके, सुरेश चौधरी, सुनील देशमुख,उमेश देशमुख, विकास देशमुख, संजय चौधरी,नाना चौधरी, योगेश शिंदे, अविनाश चौधरी, हितेश पालीवाल, शरद कोळी, मुकेश पालीवाल, राजु गीते, रमेश चौधरी, शिवराम भडके, कैलास मिस्तरी, नंदू सुर्वे, उखा बावस्कर, मनोज अंबिकर,कैलास चौधरी, भगवान शिंदे ,दीपक चौधरी, कामा पैलवान, माणुसकी समूहाचे गजानन क्षीरसागर इत्यादी मंडळी उपस्थित होते.
सूत्रसंचालन श्रीराम कलाल यांनी केले तर आभार प्रदर्शन भाजपाचे ज्येष्ठ नेते शरद सोनार यांनी मानले .