जळगाव – शहरात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या जैन प्रीमियम लीग स्पर्धेत अंतिम सामन्यात किंग्स इलेव्हन संघाने उपविजेता एम के स्पोर्ट्स संघावर 38 धावांनी एकतर्फी विजय मिळवला.
जितो जलगॉंव चाप्टर आणि श्री जैन युवा फाउंडेशनतर्फे १९ ते २२ डिसेंबरदरम्यान शहरातील जी.एस.ग्राउंडवर ‘जेपीएल-६’ (जैन प्रिमिअर लिग) या डे-नाईट क्रिकेट सामान्यांचे आयोजन करण्यात आले होते. अंतिम सामन्यात प्रमुख पाहुणे संघपती दलूभाऊ जैन, गोसेवक अजय ललवाणी, कांतिलाल कोठारी, सुरेश टाटिया, प्रविण पगारिया, महेंद्र कोठरी, गिरीष सिसोदिया, सुभाष लोढा, मोतीलाल मुणोत, प्रशांत संघवी, रमेशचंद छाजेड़, मयूर ओस्तवाल, स्वरूप लुंकड़, अभय कांकरिया, नंदलाल गादिया, राजेश चोरडिया, दिलीप चोपड़ा, ऋषभ कांकरिया, रौनक सेठिया, मुकेश ललवाणी, अशोक बेदमुथा, महेन्द रायसोनी, प्रकाश राका उपस्थित होते.
मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज आणि अंतिम सामन्याचा सामनावीर तनिश जैन, उत्कृष्ट गोलंदाज अमोल श्रीश्रीमाल, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक गौरव जैन, उत्तेजनार्थ प्रणव लोढा यांना गौरविण्यात आले. उपांत्य सामन्यात किंग्स 11 संघाने सी रॉयल्सला 32 धावांनी तर एम के स्पोर्ट्स संघाने सुखकर्ता इंडियन्स संघावर 18 धावांनी विजय मिळवला. विजयी संघ किंग्स 11,चे टीम मालक पगारिया फूड्स प्रविण पगारिया होते व उपविजेता संघ एम के स्पोर्ट्सचे मालक महेंद्र कोठारी होते.
स्पर्धेसाठी जीतो संघटनेचे चेयरमैन हेमंत कोठारी, श्री जैन युवा फाउंडेशन अध्यक्ष दर्शन टाटिया,जीतो सेक्रेटरी धरम सांखला, श्री जैन युवा संघटना सचिव रितेश छोरिया,कोषाध्यक्ष पियुष संघवी, प्रकल्प प्रमुख प्रविण छाजेड़, सौरभ कोठारी, मनोज लोढा, सचिन राका, रिकेश गांधी, प्रितेश चोरडिया, प्रणव मेहता, आनंद चांदीवाल, रविन्द्र छाजेड़, मनीष लुनिया, पारस कुचेरिया, रितेश पगारिया, जयेश ललवाणी, निरज सेठिया, कुशल गांधी, धीरज बेदमुथा, दर्शन जैन, शैलेश कटारिया, आशीष कांकरिया, यतिन राका,सुशील छाजेड़, विनय गांधी, गौरव पानगरिया यांनी परिश्रम घेतले.