प्रेमभंग झाल्याने गेल्या अनेक दिवसापासून प्रियसी बोलत नसल्याचा राग मनात असल्याने प्रियकराने भररस्त्यात प्रेयसीची लोखंडी पान्हाने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना आज मंगळवार १८ रोजी वसईच्या पूर्व चिंचपाडा परिसरात घडली. या हत्याकांडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.आरती यादव (वय 20) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी रोहित यादव याला तात्काळ बेडया ठोकल्या आहेत.
https://x.com/Nishantjournali/status/1802989334456582296?t=45yrvKtn5yDsc32PiMDv4g&s=19
प्राप्त माहितीनुसार, मृत आरतीचे आरोपी रोहित यादव याच्यासोबत प्रेमसंबंध होते. गेल्या दोन वर्षांपासून दोघे रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, काही दिवसांपूर्वी दोघांचं ब्रेकअप झालं होतं. आरती आपल्यासोबत बोलत नसल्याचा राग आरोपी रोहितच्या मनात होता.रोहित हा आरतीची मनधरणी करत होता. मात्र, ती काही त्याच्यासोबत बोलायला तयार नव्हती. यावरून रोहितला राग अनावर झाला. आणि आज मंगळवारी पहाटे त्याने आरतीचा पाठलाग केला आणि भररस्त्यात तिच्यावर लोखंडी पान्ह्याने सपासप वार केले यात आरतीचा मृत्यू झाला.