जळगाव,(प्रतिनिधी)- तालुक्यातील मण्यारखेडा तलावात अनेक माशांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी, सकाळी उघडकीस आली. दरम्यान यात ५० ते ६० क्विंटल मासे मृत्यू पावल्याचा संशय आहे या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. एमआयडीसीतून वाहून येणारे प्रदूषित पाणी, प्लास्टिक चटई उद्योगातील वेस्ट मटेरियल यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे, तर शासनाच्या वेगवेगळ्या विभागांनी समन्वयातून जागेवर पंचनामा करण्यासह मृत माशांचे व पाण्याचे नमुने पुढील तपासणीसाठी संकलित केले आहेत.
मण्यारखेडा तलावात आदिवासी मच्छीमार सहकारी संस्था यांनी लाल परी, कतला, ब्रिगेड प्रकारातील मत्सबीज सोडले होते. तलावात मासेमारी करून मच्छीमार उदरनिर्वाह करतात. शनिवारी, ते मासेमारी करण्यासाठी आले असता, तलावाच्या काठावर असंख्य मृत मासे आढळून आले. मत्सबीज टाकल्यानंतर ते सहा महिन्यानंतर निघायला लागते. मे महिन्यापासून मासे काढायला सुरुवात होते. दोन दिवसांपासून मासे मरत होते, पण शनिवारी मोठ्या प्रमाणात मेलेले मासे आढळून आले. यामुळे मच्छीमार संस्थेचे आर्थिक नुकसान झाले आहे.
मेलेले मासे तलावाच्या काठावर आले होते. काही मुलांनी ते विकण्यासाठी गोळा केले होते. त्यांच्याकडून ते जप्त करण्यात आले आहेत. तलावातील पाणी वापरू नये. गुरांना पिऊ देऊ नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने दवंडी देत गावात करण्यात आली आहे.
महाविकास आघाडीचं ठरलं! पत्रकार परिषदेत मविआच्या निर्णयाने महायुतीसमोर तगडं आव्हान
तरुणीचा आंघोळ करत असतानाचा अश्लील व्हिडिओ बनवला, नंतर जे केलं धक्कादायकचं…
पाऊस कधी आणि कुठं ; पंजाबराव डखांनी वर्तवला नवीन अंदाज
घरातचं सुरु केला वेश्याव्यवसाय ; पोलिसांनी केला असा पर्दाफाश
पती गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करतांना रंगेहाथ सापडला ; पत्नीने त्या महिलेला गेटला बांधून चोपलं