सोसायटीतील राहत्या प्लॅट मध्येचं दलालांच्या मदतीने वेश्याव्यवसाय थाटला असतांना सुरु असलेल्या वेश्याव्यवसायाचा पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने पर्दाफाश केल्याने खळबळ उडाली दरम्यान या कारवाईत दोन पिडीत महिलांची सुटका केली असून एका दलाल महिलेला मात्र बेड्या ठोकल्या आहेत.
सोसायटीमधील ज्या फ्लॅटमध्ये वेश्याव्यवसाय थाटला होता त्या फ्लॅटमालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरमालकाने भाडेकरार न करता फ्लॅट भाडेतत्त्वावर दिल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्यात दलाल महिलेसह दशरथ जंगल कोकणे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महिला पोलीस अंमलदार संगिता जाधव यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पती गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करतांना रंगेहाथ सापडला ; पत्नीने त्या महिलेला गेटला बांधून चोपलं
६ वर्षीय चिमुकलीचा बलात्कार करून नराधमाने केली हत्या ; घटनेनं जळगाव हादरलं!
रिलस्टार असलेली ५ लेकरांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार
प्राप्त माहितीनुसार, संशयित दलाल महिलेने कोकणे याच्याशी संगनमत करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी दोन महिलांना पैशांचे अमिष दाखवले. त्यातून त्या महिलांकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची माहिती गुन्हे शाखेकडील अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कक्ष विभागाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पथकाने दशरथ कोकणे याच्या रहाटणी येथील शिवीजी चौकातील फ्लॅटमध्ये अचानक छापा टाकून दोघांना बेड्या ठोकल्या.