मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. आज दुपारी 3 पर्यंत राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती मात्र दुपारी 3 पर्यंत राज्यसभेसाठी कोणीही उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे.लोकसभेत बारामती मतदार संघातून सुनेत्रा पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला होता याठिकाणी सुप्रिया सुळे या निवडून आल्या आहेत.
आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी मुंबईतील विधानभवनात राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, मंत्री छगन भुजबळ विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत राष्ट्रवादी काँग्रेसकडून मला राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. याबद्दल मी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांचा आभार मानते. त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्या संधीचे मी सोनं करेन असे ते म्हणाले.दरम्यान आता बारामतीला दोन खासदार लाभले आहेत.