पतीला गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करतांना पत्नीने रंगेहाथ पकडल्यावर पतीची धांदल उडाली असतांना पतीसोबत रोमान्स करणाऱ्या पत्नीने त्या महिलेला गेटला बांधून चोपल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजी नगर मधून उघडकीस आली आहे. दरम्यान या महिलेसोबत पतीचे अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून पत्नीने पतीच्या मैत्रिणीला दिवसभर गेटला बांधून चोप दिला. हा प्रकार पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांनी घटनास्थळी जात महिलेची सुटका केली.
चार महिन्यांपुर्वी पती पत्नीतील वाद उफाळून आल्याने पतीने पत्नी व मुलांना घराबाहेर काढलं असल्याची माहिती असून पत्नीला घराबाहेर काढल्यानंतर पतीने काही दिवसातच गर्लफ्रेंडला आपल्या घरी बोलावून तिच्यासोबत रिलेशनशीप मध्ये असल्याचं पत्नीच्या निदर्शनात आल्यावर पत्नीने भावाच्या मदतीने पती आणि त्याच्या मैत्रिणीवर लक्ष ठेवत त्यांना रोमान्स करतांना रंगेहाथ पकडले आणि त्या महिलेला घराच्या गेटला दुपारपर्यंत बांधुन चांगलाच चोप दिला या घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी पोहचत त्या महिलेची सुटका केली.
पती आणि गर्लफ्रेंड दोघांना महाप्रसाद
वडगावात घर असलेल्या घरी पत्नी सकाळच्या सुमारास पोहचली असता यावेळी पती आणि त्याची गर्लफ्रेंड घरात रोमान्स करत असल्याचं तिला दिसलं. यामुळे संतापून तिने आणि तिच्या भावाने पती आणि त्याच्या मैत्रिणीला चांगलंच चोपत प्रसाद दिला. महिलेनं पतीची मैत्रीण अनामिका हिचे हायपाय बांधून तिला घराच्या चॅनल गेटला बांधून ठेवलं. घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी झाली होती.दरम्यान पोलिसांनी सुटका केल्यानंतर तिला आणि तिच्या प्रियकराला पोलीस ठाण्यात आणलं, या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे.
६ वर्षीय चिमुकलीचा बलात्कार करून नराधमाने केली हत्या ; घटनेनं जळगाव हादरलं!
रिलस्टार असलेली ५ लेकरांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार