श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना खान्देश विभाग प्रवक्ते कॅप्टन डॉ राजेंद्रसिंह राजपूत सर,(धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर,) यांचा हिरवांकुर फाऊंडेशन नाशिक, ग्रीन सिटी जळगाव, सामाजिक वन विभाग आणि बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र भर चाळीस तालुक्यातील न्यायालय परिसरात वृक्ष दत्तक अभियानात वृक्षरोपण आणि वृक्षसंवर्धन अभियान हाती घेतल्याने विरशिरोमणी महाराणा प्रतापसिंह जन्मोत्सव सोहळ्यानिमित जळगाव येथे यथोचित सन्मान करण्यात आला. याप्रसंगी श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष श्री प्रवीणसिंह पाटील, खान्देश विभाग प्रमुख श्री विलाससिंह पाटील, जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष श्री भगवानसिंह खंडाळकर ,श्री आशिषसिंह हाडा, श्री संग्रामसिंह सुर्यवंशी व समाज बांधव यांनी खूपच स्तुत्य उपक्रम राबवत असल्याने अभिनंदन करण्यात आले व आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.????????????????????????