नवी दिल्ली – Raksha khadse Takes Charge As Minister : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील महाराष्ट्रातील एकमेव महिला मंत्री असलेल्या रक्षा निखिल खडसे यांनी आज क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालय विभागाच्या राज्यमंत्री पदाचा पदभार घेतला.
क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी पदभार घेतल्यानंतर ट्विट करून याबाबत माहिती दिली त्यात त्या म्हणतात की आनंद आणि जबाबदारीच्या भावनेने मी राज्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला आहे प्रभावी कामगिरीच्या आधारे भारताला एक क्रीडा शक्ती केंद्र बनवण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.