मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपोषणाच्या चौथ्याटप्प्याला 8 जूनपासून उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस असून उपाशीपोटी सुरु असलेल्या उपोषणाला चार दिवस, पोटात अन्नाचा कण नसल्याने त्यांची प्रकृतीही चिंताजनक झाली आहे.डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना उपचाराचा सल्ला दिला असून त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर आज नाशिकमध्ये सकल मराठा समाज आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. सकल मराठा समाज राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवारांना साकडे घालणार असल्याची माहिती मिळत आहे.