गेल्या दोन दिवसांपासून राज्यतील काही भागात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली असतांनाचं आता धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यामधील मसाला गावातून एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे, दोन दिवसापासून सुरु असलेल्या विजेसह सुरु असलेल्या पावसादरम्यान एका शेतात वीज पडल्याने त्या जागेवरून निळ्या रंगाचे पाणी जमिनीतून येतं असल्याने आश्चर्य व्यक्त होतं आहे. याबतचे स्पेशल वृत्त sam tv ने दिलं आहे.
वीज पडलेल्या जमिनीतून निळ्या रंगाचे पाणी जमिनीतून येतं असल्याने हे आश्चर्य पाहण्यासाठी परिसरातील गावाकऱ्यांनी गर्दी केली आहे दरम्यान जमिनीतून निळ्यारंगाचे पाणी कसे याबाबतचा शोध प्रशासन घेत असल्याचं समजतं.