Pushpa चित्रपटाने प्रेक्षकांवर चांगलीच भुरळ टाकली होती तर चित्रपटाच्या गाण्यांनी सुद्धा धुमाकूळघातला होता त्यानंतर पुष्पा 2 प्रदर्शित होणार असल्याने या चित्रपटाची प्रतीक्षा सर्वानाचं आहे.south superstar अल्लू अर्जुन व अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा बहुचर्चित, बहुप्रतीक्षित ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाची सध्या सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत.
सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपट येत्या १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. दरम्यान चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं आहे. ‘पुष्पा: द राइज’ चित्रपटातील गाण्यांप्रमाणेच ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील गाणी सुपरहिट झाली आहेत. सध्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ‘अंगारों’ गाण्याची भुरळ पडली आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने देखील या गाण्यावर जबरदस्त डान्स केला असून तिचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे.