दिल्ली -दिल्लीत एनडीए (NDA SARKAR) सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. नरेंद्र मोदीं व इतर मंत्र्यांचा शपथविधी सोहळा आज संध्याकाळी होतं असून आजच्या शपथविधी सोहळ्यात NDA चा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचा एकही खासदार मंत्री म्हणून शपथ घेणार नसल्याचे खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीडिया प्रतिनिधींना सांगितलं.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
मोदींच्या मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्र्यांना पंतप्रधान कार्यालयातून फोन जाऊ लागले आहेत. राज्यातील सहा खासदारांना आतापर्यंत फोन गेले आहेत. यातील चार जण भाजपचे आहेत. दरम्यान NDA चा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाला मंत्रीमंडळात समावेशा बाबत देवेंद्र फडणवीसांना विचारलं असता ते म्हणाले की, राष्ट्रवादी पक्षाला मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता त्यांना राज्यमंत्री स्वतंत्र कारभार असलेलं मंत्रालयाचा प्रस्ताव देण्यात आला होता मात्र राष्ट्रवादी कडून मंत्रिपदासाठी खा. प्रफुल्ल पटेल यांचं नाव फायनल असल्याने प्रफुल्ल पटेल हे याआधी कॅबिनेट मंत्री म्हणून काम पहिलं असल्याने त्यांना राज्यमंत्री म्हणून करता येणारं नसल्याने राष्ट्रवादी पक्षाने प्रस्ताव नाकारला आहे त्यामुळेचं त्यांच्या पक्षाचा आज मंत्रिमंडळात समावेश झालेला नाही मात्र लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल समावेश होण्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले.