रावेर लोकसभा मतदार संघातून तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेल्या रक्षाताई खडसे यांना केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान मिळालं असून या शपथविधी सोहळ्याला रक्षा खडसे यांचे सासरे माजी मंत्री आ. एकनाथ खडसे उपस्थित राहणार आहेत. रक्षा खडसे यांना मोदींच्या मंत्रिमंडळात संधी मिळाल्याने मला आनंदअश्रू आवरत नसल्याची प्रतिक्रिया खडसे यांनी दिली आहे.
रक्षा खडसे यांनी तिसर्यांना लोकसभा निवडणुकीत विजय मिळाल्याने रक्षाताई खडसे यांना केंद्रीय मंत्रीपदाची संधी मिळेल अशी चर्चा सुरू झाली होती. विशेष करून त्या विजयाची हॅटट्रीक करणार्या राज्यातील एकमेव महिला नेत्या ठरल्या असून ओबीसी समुदायाच्या असल्याने त्यांच्या नावाला पसंती दिल्याचं बोललं जात आहे.
खा. रक्षा खडसे आपल्या पदाची आज शपथ घेणार असून या शपथविधी सोहळ्याला एकनाथराव खडसे व परिवार उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.