जळगाव- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या जळगाव जिल्हा संघटक पदी दै.लोकमतचे पथराड प्रतिनिधी भगवान सुकदेव मराठे यांची दि. 19 जून रोजी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष राजा माने, प्रदेश संघटक संजयजी भोकरे, प्रदेश कार्याध्यक्ष वसंतराव मुंडे, प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे, विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा यांच्या आदेशा नुसार जिल्हाध्यक्ष प्रविण सपकाळे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या संघटनात्मक बांधणीसाठी आगामी काळात भरीव असे कार्य करणार असल्याची माहिती नवनियुक्त जिल्हा संघटक भगवान मराठे यांनी यावेळी दिली. श्री मराठे यांच्या पत्रकारितेतील कार्याची दखल घेऊन त्यांची जिल्हा संघटक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. पत्रकार भगवान मराठे यांना जिल्हाध्यक्ष प्रविण सपकाळे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र व सन्मानचिन्ह देण्यात आले. याप्रसंगी ग्रामीण जिल्हाध्यक्ष भुषण महाजन, उपाध्यक्ष शैलेश पाटील, सदस्य विजय पाल आदी उपस्थित होते. पत्रकार मराठे यांच्या नियुक्तीचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत असून त्यांना भावी वाटचालीस अनेकांनी शुभेच्छा दिल्या.