धरणगाव (प्रतिनिधी) : महाविकास आघाडीने दिलेले उमेदवार करण पाटील हे अत्यंत तडफदार, वय कमी असले तरी प्रगल्भ आणि अभ्यासू असल्याने आपल्या जिल्ह्याच्या विकासाची संधी चालून आलेली आहे. म्हणून यावेळी भाजपाला दूर ठेवून करण पाटील यांना लोकसभेत पाठवण्याचा मतदारांनी निर्धार केला असल्याचा विश्वास जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाबराव देवकर यांनी व्यक्त केला.जळगाव लोकसभा मतदारसंघांचे महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उमेदवार करण पाटील यांच्या प्रचाराच्या पहिल्या टप्प्यातील नियोजन बैठकीत ते बोलत होते.
मेळाव्याच्या व्यासपीठावर शिवसेना संपर्कप्रमुख संजय सावंत साहेब,माजीमंत्री गुलाबराव देवकर,माजी महापौर विष्णू भंगाळे,गुलाबराव वाघ, लक्ष्मण पाटील,सुरेश नाना चौधरी,निलेश चौधरी,शरद तायडे,महानंद ताई पाटील, व्ही.डी.पाटील सर, जयदीप पाटील,धनराज माळी,सुरेश भगवती,दिपक वाघमारे,भागवत आप्पा चौधरी,जानकीराम पाटील, आनंद परिहार,कैलास चौधरी, रघुनाथ पाटील,रवींद्र पाटील, मोहन नाना पाटील, पंकज महाजन आदीं मान्यवर उपस्थित होते.
मेळाव्यादरम्यान धरणगाव तालुक्यातील चांदसर येथील सुरेश चिंतामण गायकवाड, मच्छिन्द्र किसन चौधरी, रमेश सागर पाटील, प्रशांत रमेश चौधरी, श्रीराम दौलत कोळी, सुभाष एकनाथ कोळी, अशोक भिला सोनवणे, बाळू कोळी (दोनगाव), प्रशांत पाटील (कवठळ), सुकलाल कोळी (पाळधी), छोटू पाटील (साकरे), प्रवीण शिंदे (रोटवद), नंदलाल लकडू (रोटवद), प्रवीण पाटील (साळवा), सुरेश पाटील (साळवा), रवींद्र पाटील (साकरे), जगन्नाथ महाजन (गारखेडा), आनंदा गोदडे (गारखेडा), शेख कालू (धरणगाव), किरण पाटील (गारखेडा), गणेश महाजन (गारखेडा), शाम ठाकरे (गारखेडा), आकाश बडगुजर (धरणगाव), नासिर पठाण (धरणगावं), सूर्यभान शेनफडू पाटील (निंभोरा) आदींनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.
एकवचनी-सत्यवचनी श्रीरामाचे नाव घेतांना भाजपा दुतोंडी का वागतात ? – खा.उन्मेशदादा पाटील यांचा परखड सवाल
यावेळी उपस्थितांशी बोलतांना, प्रभू श्रीरामचंद्र यांच्या नावाने राजकारण करतांना,मते मागतांना भाजपा पुढे आहे पण एकवचनी – सत्यवचनी श्रीरामाचे नाव घेत हीच भाजपाची नेतेमंडळी दुतोंडी का वागतात ? असा परखड सवाल माजी खा.उन्मेश पाटील यांनी धरणगाव येथील महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या करत भाजपावर हल्लाबोल चढवला.यावेळी संपर्क प्रमुख संजय सावंत,सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ,माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील आदि नेत्यांनीही उपस्थितांना संबोधित केले.
मेळाव्यास मधुकर शंकर भदाणे, माजी सरपंच बहुकारे चंद्रकांत पाटील, उपसरपंच दिलीप भदाणे, भाऊसाहेब हटकर, भारत हिलाल भदाणे, संभाजी भदाणे, दुर्योधन पाटील, हिरालाल भदाणे, विजय भदाणे, प्रदीप पगार, दिलीप पाटील, संतोष भदाणे, रुपलाल पवार, शरद पाटील, जिभाऊ काटे, सागर पाटील, ईश्वर पाटील, विजय भदाणे, विलास काटे, भिकन कचवे, सचिन हटकर, राजेंद्र बामरे, गुलाब भदाणे, पूनमचंद काटे, वामन भदाणे, ताराचंद भदाणे, संजय बोरसे आदी उपस्थित होते.