जळगाव,(प्रतिनिधी)– राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते पक्षाचे नेते माजी केंद्रीय कृषी मंत्री खा.शरद पवार रावेर लोकसभेचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी दि. २० व रविवारी दि. २१ रोजी दोन दिवस जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.रावेर लोकसभा मतदार संघात शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. उद्योजक श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीने आपला उमेदवार विजयी होण्यासाठी सर्वस्तरावर प्रचार यंत्रणा कामाला लावली आहे दरम्यान श्रीराम पाटील यांच्या प्रचार्थ शरद पवार जळगाव जिल्ह्यात येत असून आपल्या उमेदवाराच्या विजयासाठी मोठी ताकद उभी करून रावेर लोकसभेत विरोधकांचे समीकरण बिघडवून शरद पवार ‘पॉवर’ दाखवणार का हे पाहणे महत्वाचे ठरेलं.
चोपडा, रावेर येथे सभा
लोकसभा निवडणुकीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते शरद पवार राज्यभर दौरा करीत आहेत. त्यांच्या ठिकठिकाणी उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा होत आहेत. त्यानुसार रावेर लोकसभा मतदारसंघात चोपडा व रावेर येथे शरद पवार सभा घेणार आहेत.
जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघात शरदचंद्र पवार पक्षातर्फे श्रीराम पाटील उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी शरद पवार जिल्ह्यात येत आहेत. शनिवारी दि. २० ला दिंडोरी जि. नाशिक येथील सभा आटोपून सायंकाळी साडेपाचला ते जिल्ह्यात चोपडा येथे येत आहेत.
जामनेर येथे मेळावा
शनिवारी चोपडा येथे उमेदवाराच्या प्रचारार्थ शरद पवार यांची जाहीर सभा होईल. त्यानंतर रात्री मुक्कामी असतील. रविवारी दि. २१ ला ते सकाळी १० वाजता जामनेर येथे कार्यकर्ते मेळावा घेणार त्यानंतर रावेर येथे दुपारी १ वाजता सभा घेतील. त्यानंतर दुपारी तीनला वर्धा येथे रवाना होतील.