जळगाव,(प्रतिनिधी)- भाजपाला धक्का देत खा. उन्मेष पाटील व पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश व करण पवार यांना जळगाव लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काल सायंकाळी साडेपाच वाजता जळगावात दाखल झाले असता जळगाव रेल्वे स्टेशनवर दोघा नेत्यांचे शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले.
यावेळी जळगाव रेल्वे प्लॅटफार्मवरून येतानाचं उमेदवार करण पवार, उन्मेष पाटील, शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत, सुनील महाजन व अन्य नेत्यांच्या हातात पेटलेल्या ‘मशाल’ घेऊन रेल्वे स्टेशन बाहेर आले यावेळी शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घोषणा देत, ढोल ताशांच्या गजरात स्वागत केले.दरम्यान स्टेशन बाहेर असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.