जळगाव,(प्रतिनिधी)- जळगाव लोकसभा मतदार संघाचे खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापले गेल्याने ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरु असून याबाबत मात्र खासदार उन्मेष पाटील यांच्याकडून अद्याप अधिकृतरित्या सांगण्यात आलेलं नाही दरम्यान उन्मेष पाटील हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश करणार असल्याचे सूत्रांकडून समजते, जर भाजपाचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी भाजपाला सोडचिट्ठी दिल्यास आणि शिवसेना उबाठा पक्षाकडून निवडणूकीत स्वतः किंवा त्यांच्या पत्नी संपदा पाटील यांना उमेदवारी केल्यास जळगाव लोकसभेत लढत काट्याची टक्कर होईल निश्चित.
भाजपाचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापल्या नंतर त्यांचे समर्थक प्रचंड नाराज आहेत दरम्यान उन्मेष पाटील यांनी नाराज नसल्याचं सांगितलं होतं मात्र त्यांची भाजपा बैठकामधील अनुपस्थित बरंच काही सांगत आहे. याचं काळात उन्मेष पाटील यांच्या पत्नी संपदा पाटील या शिवसेना उबाठा पक्षाकडून उमेदवारी करू शकतात अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होतं आहेत दरम्यान उन्मेष पाटील की त्यांच्या पत्नी दोघांपैकी कोण उमेदवारी करणार हे उद्या ३ एप्रिल रोजी निश्चित होण्याची शक्यता असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
भाजपा खासदार उन्मेश पाटील शिवसेना उबाठा ठाकरे पक्षाच्या वाटेवर?
भाजपाने तिकीट कापल्यापासून विद्यमान खासदार उमेश पाटील हे भाजपाच्या संपर्कात नाही,दरम्यानच्या काळात लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठका,मेळावे यात खा. उन्मेष पाटील मात्र दिसून आले नाही.मंत्री गिरीश महाजन यांनी देखील दोन वेळा संपर्क केला असल्याचे त्यांनी माध्यमांसमोर सांगितले होते त्यावेळी त्यांचा संपर्क होऊ शकला नाही, असे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले त्यामुळे खरोखर उन्मेष पाटील हे भाजपाच्या संपर्कात नसल्याचे दिसून आले.
दरम्यान भाजपाचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचा पत्ता कट केल्याने ते आणि त्यांचे समर्थक नाराज दिसत आहे. जळगाव लोकसभेत उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी अनेकदा दिल्लीवारी केली. मात्र, त्यांना यश मिळाले नाही, त्यांचे तिकीट कापून भाजपाने स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आहे. जळगाव जिल्ह्यातील जळगाव लोकसभा व रावेर लोकसभा दोनही भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो असं असलं तरी विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी किंवा त्यांच्या पत्नी संपदा पाटील यांनी उमेदवारी केल्यास या मतदार संघात काट्याची लढत होईल, विद्यमान खासदार यांची या मतदार संघात असलेली ताकद आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद पाहता भाजपा उमेदवार स्मिता वाघ यांच्या समोर मोठं तगडं आव्हान उभं राहील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.