लोकसभा निवडणूकीकरिता जवळपास सर्वच पक्षाचे उमेदवार जाहीर झाले असून राज्यातील काही जागांवर उमेदवार देणे बाकी आहे. प्रत्येक पक्ष उमेदवार देतांना कसा ताकदीचा देता येईल यावर भर देतांना मात्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाने दिंडोरी मतदार संघातून एका शिक्षकाला उमेदवारी दिली असून या उमेदवारासाठी थेट मतदारांनी ५००,१०००,२००० रुपयांची लोकवर्गणी जमा करून निवडणूक लढण्यासाठी मदत केली आहे ही रक्कम जवळपास १० लाखाच्या वर पोहचली असून ही मदत पुढे वाढत जाण्याची शक्यता आहे अशी माहिती राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी x हॅण्डल ट्विट करून दिली आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून दिंडोरी लोकसभेचे उमेदवार आहेत. त्यांच्या चांगल्या स्वभावामुळे ते भास्कर भगरे सर म्हणून शिक्षक आणि पालकांत प्रसिद्ध आहेत. सध्या ते पिंपळगाव बसमत येथील कन्या शाळेत शिक्षक आहेत. फोटो निरखून पाहिला तर त्यांच्या घरातील परिस्थिती सहज लक्षात येईल.
उमेदवारी जाहीर केल्यानंतर आज वणी येथे इंडिया आघाडीची पहिली बैठक ठेवलेली. या बैठकीला नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. समोरील उमेदवार पैशाने मजबूत असल्याने आजच्या बैठकीला आलेल्या अनेकांनी स्वतः पुढाकार घेऊन ५००, १०००, २००० अशी शक्य ती रक्कम लोकवर्गणी गोळा करून त्यांना दिली. बैठक संपल्यावर त्या जमा झालेल्या लोकवर्गणीची रक्कम मोजली तर दहा लाखाच्यावर झाली होती, हा आकडा हळू हळू वाढत आहे.
या उदाहरणा वरून लक्षात येते की शरद पवारांच्या उमेदवारांची निवडणूक आता ही पक्षाची निवडणूक राहिली नसून ती सर्वसामान्य जनतेने हातात घेतलेली निवडणूक झाली आहे. प्रत्येकजण आपल्या पटीने जमेल ती मदत साहेबांना करत आहे. भगरे सर यांच्या सारखा प्रामाणिक शिक्षक लोकसभेत दिसायलाच हवा, अशी लोकांत जनभावना बळावत आहे. त्यामुळे धनाढ्य व्यक्तीला पाडून बदल झाला तर लोकांना आश्चर्य वाटणार नाही..