जळगाव,(प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्षासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी सोबत येत ‘महायुती’ सरकार स्थापन केले आहे यासोबतच अजून इतर मित्र पक्षांना सोबत घेत भाजपा लोकसभा निवडणुक रिंगणात मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी उतरली आहे. ‘अबकी बार, ४०० पार ‘ नारा भाजपा दिला आहे, सोबतच भाजपात मोठ्या प्रमाणात सुरु असलेली इन्कमिंग सुरु आहेत यामुळे भाजपाला लोकसभेत भरभरून यश मिळेल असा विश्वास आहे. दरम्यान राज्यातील असलेल्या ‘महायुती’ बाबत भाजपा नेते मंत्री गिरीश महाजन यांनी एक सूचक वक्तव्य केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा होतं आहे.
काय म्हटले मंत्री गिरीश महाजन….
मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या जामनेर विधानसभा मतदार संघात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले की,महायुतीमधील सहभागी असलेले पक्ष फार काळ सोबत राहणार नाहीत, कारण लोकांचा यांच्यावर विश्वास राहिलेला नाही, असे वक्तव्य महाराष्ट्राचे संकट मोचक व भाजपचे नेते व स्टार प्रचारक गिरीश महाजन यांनी जामनेर येथे पत्रकारांशी बोलताना केले.युतीमध्ये शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना शून्य किंमत असून, जास्त दिवस ते सोबत राहणार नसल्याचे एक सूचक वक्तव्य नामदार गिरीश महाजन यांनी केले.
युतीतील पक्ष एकत्र राहिलेच तरी लोकांचा विश्वास नाही
जामनेर येथील कार्यक्रम झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना नामदार गिरीश महाजन म्हणाले की, ज्याप्रमाणे आघाडीमध्ये भांडणे सुरू आहेत. त्याचप्रमाणे महायुतीची परिस्थिती आहे. अजूनही भांडणे सुरू आहेत. ही भांडणे टोकाची करत आहेत. मैत्रीपूर्ण लढत करू असे युतीमधील पक्षांकडून दावा केला जात आहे. परंतु हे फार काळ सोबत राहणार नाहीत असे वाटते आणि राहिलेच तर लोकांचा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही, असेदेखील गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले आहे.
लोकांना केवळ मोदींचे नेतृत्व मान्य-गिरीश महाजन
लोकांना एकच नेतृत्व म्हणजे मोदींचे नेतृत्व मान्य आहे. त्यांना पंतप्रधान करायचंय, कोणीही निवडणुकीमध्ये युती, आघाडी, महाआघाडी केल्या तरी, त्याचा परिणाम मतदानावर होणार नाही. याचा अर्थ असा की मतदार फक्त भाजपालाच वोटिंग करणार असल्याचा दावादेखील गिरीश महाजन यांनी आपल्या वक्तव्यातून माध्यमांशी बोलताना केला.