आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला धक्का देणारी बातमी समोर आली असून प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.याबाबत वंचित पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे.
वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत सामावून घेण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या काँग्रेससह मित्रपक्षांच्या नेत्यांना प्रकाश आंबेडकर यांनी मोठा धक्का दिला आहे. आंबेडकर यांनी स्वतंत्र निवडणुका लढण्याची घोषणा केली आहे तर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना सोबत घेऊन वंचित बहुजन आघाडी लोकसभेची निवडणूक लढणार आहे.
वंचित बहुजन आघाडीला लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर
• वंचित बहुजन आघाडी राज्य कमिटीच्यावतीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नागपुरातील उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
• वंचित बहुजन आघाडी राज्य कमिटीने सांगलीतून श्री. प्रकाश शेंडगे (ओबीसी बहुजन पार्टी) यांना उमेदवारी दिल्यास त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
• रामटेक मधील उमेदवाराचा निर्णय आज संध्याकाळी 4 वाजेपर्यंत होईल.
• नागपुरात काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय झाला आहे.