पाचोरा (प्रतिनिधी)- तरुण युवकांनी व तरुण युवतीने व्यसन आणि फॅशन याच्या नादात पडू नये आणि जर या व्यसनात पडलेच तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला व आपल्या कुटुंबाला भविष्यात भोगावे लागतील असे प्रतिपादन समाज प्रबोधनकार ह भ प निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी पाचोरा येथील शेठ मुरलीधर जी मानसिंगा महाविद्यालयाच्या भव्य पटांगणात जागतिक महिला दिनानिमित्त महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या किर्तन सोहळ्यात केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वर्गीय लोकनेते सहकार शिक्षण महर्षी माजी आमदार ओंकार नारायण वाघ यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले समाज प्रबोधनकार ह भ प निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे स्वागत व सत्कार पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार जिल्हा दूध संघाचे संचालक श्री दिलीप वाघ संस्थेचे चेअरमन श्री संजय वाघ व्हाईस चेअरमन श्री विलास जोशी नगरसेविका सौ सुचेता ताई वाघ तनिष्का गटप्रमुख सौ ज्योतीताई वाघ नगरसेवक श्री भूषण वाघ श्री आकाश वाघ श्री सुरज वाघ श्री गौरव वाघ यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन करण्यात आला याप्रसंगी महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तबगार 25महिलांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला समाज प्रबोधनकार ह भ प निवृत्ती महाराज इंदुरीकर पुढे म्हणाले की तरुण युवक दारू गांजा भांग चरस सत्ते पत्ते या व्यसनाच्या नादात पडल्यामुळे तारुण्यातच तरुणांचे मृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे त्यामुळे कुटुंबप्रमुखावर मोठा आघात होतो त्या दुःखातून त्या परिवाराला सावरणे कठीण होत जाते व्यसनामुळे तरुण व्यक्तीचं आकस्मिक निधन झाल्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रसंगाचे हृदय द्रायक वर्णन हुबेहूब केले असता प्रेक्षकांचे महिला वर्गाचे डोळे पाण्याने डब डबले म्हणून युवकांनी कोणतेही व्यसन न करता त्या व्यसनापासून दूर राहावे तसेच तरुण युवकांनी आणि युवतींनी फॅशन पासून दूर राहिले पाहिजे तरुण युवती व युवकांनी अंगभर वस्त्र पोशाख केला पाहिजे अर्धवट अंगप्रदर्शन तरुणांनी आणि तरुणींनी करता कामा नये आज महिला फॅशनच्या नावाखाली चित्र विचित्र पोशाख परिधान करतात हे वागणं बरं नाही म्हणून व्यसन आणि फॅशन याची गंभीर दुष्परिणाम त्या व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबाला भोगावे लागतात मुलींनी घरातून प्रियकरा सोबत पळून जाता कामा नये जीवनाचा साथीदार जोडीदार निवडताना काळजी घ्या आपले हृदय कोणालाही देऊ नका एवढं ते स्वस्त आहे का याची जाणीव ठेवा मुलींनी असे वागावे की ज्यामुळे आपल्या आई-वडिलांना ताठ मानेने समाजासमोर जीवन जगता आले पाहिजे त्यांची मान शरमेने खाली जाईल असे मुला मुलींनी वागू नये
पुढे ते म्हणाले की तरुणांनी आपल्या अंगातील ताकद जपून वापरली पाहिजे त्या ताकदीचा उपयोग समाजासाठी देशासाठी झाला पाहिजे त्या ताकदीचा उपयोग दंगली करण्यासाठी टपरी घरे पेटवण्यासाठी करता कामा नये तरुणांनी स्वतःच्या पोटापाण्याचा प्रश्न स्वतः सोडला पाहिजे दुसऱ्यावरती अवलंबून राहता कामा नये चांगल्या मार्गाने धन संपत्ती कमवली पाहिजे कमवलेल्या पैशाचा वेळेचा जपून वापर केला पाहिजे वेळेचाही सदुपयोग केला पाहिजे मुलगी देताना मुलाचा रंग पाहून मुलगी देऊ नका मुलाचे कर्तुत्व बघा शेतकऱ्यांनीही लग्नाचा खर्च कमीत कमी केला पाहिजे लग्नातील अनिष्ट प्रथा बंद करा कमीत कमी लोकांमध्ये मुला मुलींची लग्न लावा मोठमोठी जेवणावळी पद्धत बंद करा कर्ज होईल असा अनावश्यक खर्च टाळा अंगातील ताकद खिशातील पैसा जपून वापरा कष्ट करेल तो जगेल कष्टाला पर्याय नाही पुढील काळात शेती व्यवसाय हा धोक्या येण्यासारखा आहे लेबर प्रॉब्लेम ही मोठी समस्या शेतकऱ्यांपुढे निर्माण झाली आहे संपत्ती आणि दुर्गुण एकत्र राहतात संपत्ती आणि सदगुण एकत्र राहत नाही आणि ज्या ठिकाणी ते एकत्र राहतात त्या ठिकाणी मानव देव बनतो संपत्तीचा गर्व अहंकार बाळगू नका साधेपणाने जीवन जगा पैसा श्रेष्ठ आहे परंतु त्याचा सदुपयोग झाला पाहिजे याप्रसंगी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप वाघ संस्थेचे चेअरमन संजय वाघ व्हाईस चेअरमन व्ही टी जोशी ज्येष्ठ संचालक दगाजी वाघ सतीश चौधरी उर्फ भोलाप्पा प्रकाश पाटील हारून देशमुख प्राचार्य डॉ शिरीष पाटील उपप्राचार्य डॉ वासुदेव वले डॉक्टर जे व्ही पाटील प्रा अतुल सूर्यवंशी प्रा इंगळे प्रा साहेबराव पाटील प्रा बंटी महाजन प्रा गिरीश पाटील संस्थेचे सर्व सन्माननीय संचालक पदाधिकारी प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ अतुल सूर्यवंशी आभार प्रदर्शन प्रा डॉ उपप्राचार्य वासुदेव वले यांनी केले