पाचोरा येथे व्यवसाय करून समाजकारणात व राजकारणात सहभाग घेत असतात कृष्णापुरी भागातील रहिवाशी त्यांचा मान ठेवत असतात पाचोरा कृष्णापुरी भागातील रहिवासी असलेले श्री संजय उर्फ बापू एरंडे यांनी भारत डेअरी स्टॉप जवळ अश्विनी ऑटोमोबाईल्स व महेंद्र शोरूम हे दुकान टाकून आपला व्यवसाय सुरू केला त्यांनी योग्य ठिकाणी व योग्य जागेत आपला व्यवसाय सुरू करून हायवे ला जाणाऱ्या येणाऱ्या गाड्या यांना काही प्रॉब्लेम आल्यास तात्काळ सेवा म्हणून त्यांची सेवा असते कोणाची कुठलीही गाडी बंद पडल्यास किंवा बिघाड झाल्यास ताबडतोब कारागीर मार्फत गाडी दुरुस्ती केली जाते तसेच सर्व प्रकारचे स्पेअर पार्ट त्या ठिकाणी उपलब्ध असल्यामुळे त्या गाडीधारकांना कुठलाही त्रास होत नाही तसेच त्यांनी नवीन गाड्यांचे महेंद्र कंपनीचे शोरूम चालू केलेले असून आपल्या मुलांनाही त्याच व्यवसायात ठेवले आहे मुलांना नोकरीला न लावता व्यवसायात त्यांनी गुंतवले असून श्री संजय बापु एरंडे यांनी व्यवसाया ची श्रीगणेशा ही २६/१/१९८९ या वर्षी केलेली आहे या व्यवसायासोबत १९९२ साली राजकारणात सुद्धा भाग घेऊन त्या परिसरात त्यांचे चांगले कार्य असून सर्वांशी मिळून-मिसळुन राहत असतात त्यांचा स्वभाव मितभाषी तसेच अत्यंत गोड असून माणसं जोडणं हीच त्यांची एक ख्याती आहे. त्यांचा सर्वपक्षीय संबंध असुन सुद्धा पक्षाशी एकनिष्ठ आहेत.त्यांच्या चांगल्या कामाची दखल मागील काळात माजी आमदार श्री दिलीप भाऊ वाघ यांनी त्यांना नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून त्यांची नियुक्ती केली होती. त्या काळात त्यांनी अनेकांचे प्रश्न सोडवले असून आज ही त्यांची कामाची धडपड पाहता त्यांची उमेद उत्साह तसेच त्यांचे वय 55 असले तरी तरुण तडफदार असून पुन्हा आपला व्यवसाय सांभाळून समाजकारण व राजकारणावर भर देत असतात त्यांचा वाढदिवस हा १३ मार्चला संध्याकाळी अती उत्साहाने साजरा करण्यात आला. त्या परिसरातील सर्व तरुण मुलांनी त्यांचा वाढदिवस साजरा करून आनंद व्यक्त केला तसेच त्यांचे सर्वांशी संबंध सलोख्याचे असल्याकारणाने सर्व गटाचे कार्यकर्ते तसेच माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते शुभेच्छा देण्यासाठी येऊन गेले व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी सार्वे पिपरी पाचोरा येथील मित्रपरिवार, छत्रपती शाहु महाराज विकास मंडळ,माऊली गृप,सर्व मॅकेनिक बंधु ,यांनीही उत्साहाने त्यांचा वाढदिवस साजरा केला.