वृद्ध सासऱ्याला सुनेकडून काठीने मारहाण झाल्याची घटना समोर आली असून घटनेचा व्हिडीओ CCTV फुटेजसोशल मीडियात व्हायरल झाला आहे सदर घटनेचा व्हिडीओ पाहून तुमच्याही मनाला थरकाप सुटेल असं कृत्य या सुने कडून झाले आहे.सदर घटना कर्नाटकच्या मंगळुरुमधील आहे.दरम्यान मुलीच्या तक्रारी नंतर या निर्दयी सुनेला पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कर्नाटकच्या मंगळुरूमध्ये राहणारी महिला उमाशंकर ही विद्युत मंडळात काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे. सोमवारी या महिलेने आपल्या वृद्ध सासऱ्याला बेदम मारहाण केल्याची तक्रार नजिकच्या कनकनडी पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. वृद्ध सासरे पद्मनाथ सुवर्णा यांच्या मुलींनी ही तक्रार दिली होती.
मंगलुरु के कुलशेखर में 87 वर्षीय व्यक्ति पद्मनाभ सुवर्णा को उनकी बहू उमा शंकरी ने बेरहमी से पीटा। पुलिस ने महिला को गिरफ्तार कर लिया है। #Karnataka pic.twitter.com/dqz0mTjGqK
— Versha Singh (@Vershasingh26) March 12, 2024
व्हायरल व्हिडिओमध्ये महिला आपल्या वृद्ध सासऱ्याला निर्दयीपणे मारहाण करत आहे. दरवाजा लाऊन घेत हातातील काठीने बेदम मारहाण करत आहे. वृद्ध सासरा वेदनेने विव्हळत असतानाही ती मारहाण करते. धक्कादायक बाब म्हणजे तिने सासऱ्याला धक्का देऊन जमिनीवर पाडल्याचेही दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.
दरम्यान, पद्मनाभ सुवर्णा यांची मुलगी प्रिया सुवर्णाने आणि तिचा भाऊ प्रीतम सुवर्णाच्या सूचनेवरून तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपी सुनेला अटक केली असून सध्या चौकशी सुरू आहे.
या तक्रारीनुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन या निर्दयी महिलेला अटक केली आहे. ही मारहाणीची घटना ९ मार्च रोजी घडल्याचे सांगण्यात येत असून सोमवारी हा प्रकार उघडकीस आला. सुनेने वृद्ध सासऱ्याला केलेल्या मारहाणीची घटना घरातील सीसीटिव्ही कॅमेऱ्यातही (CCTV Footage) कैद झाली आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.