चाळीसगाव – चाळीसगांव शहर पोलीस स्टेशन हददीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने धुळे रोड, तेजस कोणार्ककडे जाणारे रोडवर नाकाबंदी लावण्यात आली होती. नाकाचंदी दरम्यान धुळयाकडुन मोटार सायकल क्रं. MH १२ VX ३००८ हिचेवरुन चाळीसगावचे दिशेने दोन इसम येत होते. नाकाबंदी सुरु असलेली पाहून गाडी चालविणा-या इसमाने काही अतंरावर मोटार सायकल थांबविली. तेव्हा पाठीमागे बसलेला इसम गाडीवरुन उतरुन धुळे रोडच्या आजुबाजूचे रहिवाशी परीसरात पळून गेला. त्यामुळे पोलीस स्टाफने पळत जावुन मोटार सायकल चालवित असलेल्या इसमास दिनांक 10 रोजी मोटार सायकलीसह ताब्यात घेतले.
त्यास त्याचे व पळून गेलेल्या इसमाचे नांव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव आमीर आसीर खान, वय २०, रा. काकडे वस्ती, कोढंवा, पुणे व त्याचे सोबत असलेल्या इसमाचे नाव आदित्य भोईनल्लू, रा.पुणे असे सांगितले. त्यानंतर ताब्यात घेतलेला आमीर आसीर खान याचेकडील रॉक (बॅग) तपासली असता त्यामध्ये गावठी बनावटीचे ४ पिस्टल, ५ मॅगझ ीिन व १० जिवंत काडतुस, एक मोटार सायकल असा एकुण २,०१,०००/- रु. किंमतीचा शस्त्रसाठा व मुददेमाल मिळून आला आहे. त्यामुळे दोन्ही आरोपींचे विरुध्द चाळीसगांव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि.क्रं. ११०/२०२४ शस्त्र अधिनियम कलम ३/२५, भादवि कलम ३४ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) चे उल्लघंन १३५ प्रमाणे पोकॉ ३३६३ पवन पाटील यांचे फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हयातील मिळुन आलेला आरोपी आमीर आसीर खान याचेकडे केलेल्या तपासात तो शरीराविरुध्द गंभीर गुन्हे करणारा सराईत, तडीपार असलेला गुन्हेगार असुन समर्थ पोलीस स्टेशन गुरनं. २१८/२०२३ भादवि कलम ३०२, ३०७ सह सघंटीत गुन्हेगारी अधिनियम प्रमाणे दाखल गुन्हयात मागील ६ महिन्यापासुन फरार आहे. त्याचेवर एकुण ६ गंभीर गुन्हे दाखल असुन त्याला पुणे जिल्हयातुन दोन वर्षाकरीता तडीपार करण्यात आलेला आहे. नमुद आरोपीचा साथीदार आदित्य भोईनल्लु, रा.पुणे हा फरार असुन त्याचा देखील शोध सुरु आहे. नमुद आरोपीने एवढ्या मोठ्या प्रमाणात शरत्रसाठा कोठून आणला? व त्यांनी काही घातपाती कारवाया करण्याचा कट रचला आहे काय ? यायावत तपास सुरु आहे.
सदर कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. महेश्वर रेडडी सो. जळगांव, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती कविता नेरकर सो चाळीसगांव परीमंडळ, मा. सहा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. अभयसिंह देशमुख सो. चाळीसगांव उपविभाग, भा.पोलीस निरीक्षक श्री. संदिप पाटील सो. चाळीसगांव शहर पो.स्टे., यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि श्री.सागर एस. ढिकले पोउपनिरीक्षक श्री. सुहास आव्हाड, श्री.योगेश माळी, पोहेकॉ १७२० राहुल सोनवणे, पोना ३१३६ महेंद्र पाटील, पोकों ३३६३ पवन पाटील, पोकों १८०८ मनोज चव्हाण, पोकॉ २०८ आशुतोष सोनवणे, पोकों २५४५ रविंद्र वच्छे, पोकों ९८८ ज्ञानेश्वर गीते, पोकों ५५२ ज्ञानेश्वर पाटोळे, पोकों १६२२ नंदकिशोर महाजन, पोकों ४४७ समाधान पाटील या पथकाने सदरची कारवाई केली असुन पुढील तपास पोउपनिरीक्षक श्री. सुहास आव्हाड, पोकों ४३५ प्रकाश पाटील, पोकों १७४१ उज्वलकमार म्हस्के हे करीत आहेत.