जळगाव,(प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय केळी तज्ज्ञ डॉ,के. बी,पाटील यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी,विद्यापीठ जळगाव यांचे कडून नुकतीच पीएचडी(विद्यावाचस्पती) पदवी प्रदान करण्यात आल्याने दिनांक १०मार्च रोजी राजपूत परिवार टीम खान्देशच्या वतीने श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना ,जळगाव ,महाराणा उत्सव समिती व केसरिया प्रतिष्ठान जामनेरच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी जळगाव चे उद्योजक तथा करणी सेनेचे राज्य कार्यध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
याप्रसंगी खान्देश विभाग प्रमुख श्री विलाससिंह पाटील मुक्ताईनगर ,श्री विठ्ठलसिंह मोरे खान्देश विभाग कार्याध्यक्ष ,श्री भगवान सिंह खंडालकर जिल्हा कार्याध्यक्ष जळगाव , केसरिया प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रा. डी एस.पाटील सर ,महाराणा प्रतापसिंह उत्सव समिती, जामनेर चे अध्यक्ष तथा *इतिहास अध्यासक व जिल्हा प्रवक्ते प्रा.डॉ.श्री विश्वजितसिंह सिसोदिया सर ,तोरनाळा हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री मनोहर पाटील सर ,मोयगव बु चे सरपंच प्रा,श्री महेंद्रसिंह राजपूत सर,श्री सुभाष पाटील सर,स्वामी ग्राफिक्स चे वैभव पाटील उपस्थिती होते.
डॉ,के,बी,पाटील स यांच्या सोबत सखोल चर्चा राजपूत शिष्टमंडळ यांनी केली असता आज पर्यंत 40 परदेश दौरे करून आंतरराष्ट्रीय पातळीवर केळी संदर्भात संशोधन व मार्गदर्शन साहेबांनी केले ही अभिमानाची गोष्ट.विविध अनुभव , केळी विषयावरील संशोधन ,शेतकरी मार्गदर्शन ,व जगभरातील मान्यवरांच्या भेटी व केळी पीक संदर्भात सर्व अनुभव पाटील साहेब यांनी कथन केले. प्रसंगी श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना दिनदर्शिका 2024 साहेबांना श्री प्रवीणसिंह पाटील श्री विलाससिंह पाटील सह शिष्टमंडळाने भेट दिली.या दिनदर्शिकेचे ऐतिहासिक विशेष डॉ विश्वजीत सिसोदिया सरांनी विशद केले.